राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती संपन्न

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाची नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. नियुक्तीचा कार्यक्रम अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अमीर शेख व अल्पसंख्यांक शहर जिल्हा कार्यध्यक्ष संजीव मोरे यांनी आयोजित केले होते.
मनोगत व्यक्त करताना शहर जिल्हा कार्यध्यक्ष जुबेर बागवान यांनी पदाधिकाऱ्यांना राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिले. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे विचार सामान्य माणसा पर्यंत पोहचवन्या साठी व पक्ष संघटना बढकट करण्यासाठी आपण दिलेल्या पदाच योग्य वापर करून पक्षाचा कार्य करावा अशी सूचना केली.
यावेळी नूतन पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्षपदी मेहबूब इस्माईल रेड्डे, मुसेब एजाजअहमद शेख, शहर जिल्हा सचिवपदी जैद बागवान, शकील बोळे, शहर जिल्हा सरचिटणीस पदी अयाज जाविद शेख, शोहेब महोम्मद उस्मान बागवान यांच्या निवडी करण्यात आल्या.
या वेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अमीर शेख, अल्पसंख्यांक शहर जिल्हा कार्याध्यक्ष संजीव मोरे, महाराष्ट्र ओबीसी सेल उपाध्यक्ष संतोष भाकरे, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादिराजे, अल्पसंख्यांक शहर जिल्हा सरचिटणीस अनिस शेख, अल्पसंख्यांक सोलापूर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष नवाज शेख इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.