तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या वतीने 150 बचत गटातील महिला आणि 20 युवकांना मदत कार्यासाठी उज्जैन, ओंकारेश्वर, महाकाल येथे देवदर्शनासाठी रवाना

सोलापूर : माजी उपमहापौर तथा तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही बचत गटातील महिलांना आणि आपल्या जय महाराष्ट्र तरुण मंडळातील 20 युवकांना उज्जैन, ओंकारेश्वर, महाकाल यासह परिसरातील सर्व धार्मिक स्थळांना देवदर्शनासाठी धार्मिक सहल काढली. यामध्ये बचत गटातील 150 महिलांना सोबत घेऊन माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांनी त्यांचे सर्व जाण्याचे येण्याचे राहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे यासाठी आज ते रेल्वेने रवाना झाले.
सोलापूर शहर मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पत्नी मोनिका देवेंद्र कोठे आणि महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक विनायक कोंड्याल यांच्या पत्नी धनश्री विनायक कोंड्याल यांनी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका मंगला कोल्हे आणि सर्व महिलांना धार्मिक यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
बचत गटातील 150 महिला आणि मदत कार्यासाठी येणाऱ्या 20 युवकांची सोलापूर ते उज्जैन आणि उज्जैन ते सोलापूर रेल्वेने जाणे येणे यासह तेथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केली आहे.
या धार्मिक यात्रेमध्ये मदत कार्यासाठी मंगेश डोंगरे, आरिफ निगेबान, सतीश मस्के, कल्लाप्पा कामाने, मंगला डोंगरे, मल्लवा उपासे, उषा नायडू, गीता डुकरे, जया माने, राधा गायकवाड, वंदना जाधव, कविता चव्हाण, हे परिश्रम घेत आहेत.