crossorigin="anonymous"> वीर संभाजी तरुण मंडळाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत लेझीम पथक – Swarajya News Marathi

वीर संभाजी तरुण मंडळाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत लेझीम पथक

0
वीर संभाजी तरुण मंडळाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत लेझीम पथक

सोलापूर – वीर संभाजी तरुण गणेशोत्सव मंडळ बुधवार पेठ, पठाण चाळ सोलापूर वतीने गणेशोत्सव विसर्जन निमित्ताने पारंपारिक ढोल ताशा वाजत गाजत लेझीम चे डाव सादर करत मिरवणूक काढण्यात आली.

प्रथम यावेळी सोलापूर महानगरपालिका मा. नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांच्या हस्ते श्री ची पूजा व आरती करून या भव्य लेझीम चे डाव सुरुवात करण्यात आली.

वीर संभाजी गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांनी लेझीम चे अनेक बहारदार डाव सादर केले .
सदर गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पठाण चाळ येथून सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौक ते दत्त चौक श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिर गणपती घाट येथे विसर्जन करण्यात आली.

यावेळी पठाण चाळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शुभम साळुंखे ,विजय भगरे, दशरथ माने ,विकास गिराम, नागेश गिराम, जाबीर शेख, सतीश भुजरंगे, विनायक कटके ,राहुल पवार, राहुल माशाळ, प्रसाद पडवळकर , गणेश सलगर, नाना सलगर, अजय रेळेकर, पिंटू माळवदकर, प्रतिकरत्न पारखे,नरेंद्र साळुंखे, विनायक सुरवसे ,ओंकार कंदले ,समर्थ गिराम ,राम भुजरंगे, ऋषिकेश सुरवसे, सनी भोसले इत्यादी पठाण चाळ गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!