समृद्धी कला मंचच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण

सोलापूर – समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित समृद्धी कला मंचची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांची तर प्रमुख कार्यवाह पदी संजय सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
चंद्रकांत होळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
नाट्य सेवेतील कार्याबद्दल सुमित फुलमामडी व किरण लोंढे यांना समृद्धी नाट्य सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी चंद्रकांत होळकर, मल्हारी बनसोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक कलखांबकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. माधुरी भोसले यांनी केले.
या नूतन कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष (प्रशासन) मल्हारी बनसोडे, उपाध्यक्ष (उपक्रम) सुमित फुलमामडी, उपाध्यक्ष( उपक्रम) किरण लोंढे, सहकार्यवाह( प्रशासन) हिरालाल धुळम, सहकार्यवाह( उपक्रम) पुंडलिक कलखांबकर व श्रीमंत कोळी, कार्यकारिणी सदस्य म्हणून
मल्लिनाथ यांची निवड करण्यात आली.