crossorigin="anonymous"> थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सव अध्यक्षपदी सुजित खुर्द – Swarajya News Marathi

थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सव अध्यक्षपदी सुजित खुर्द

0
थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सव अध्यक्षपदी सुजित खुर्द

सोलापूर – थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सव अध्यक्षपदी सुजित खुर्द तर कार्याध्यक्षपदी नागेश दहीहंडी यांची निवड करण्यात आली.

थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सव वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५-२६ व पदाधिकारी निवड बैठक मंडळाचे आधारस्तंभ तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनपा शिक्षण मंडळ माजी सभापती तथा कुशल संघटक संकेत पिसे व मंडळाचे सर्व ज्येष्ठ सल्लागार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. 25 जुलै रोजी संपन्न झाली. याप्रसंगी विविध विषयावर चर्चा करण्यात आली व नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ज्येष्ठ हलगी वादक स्व.अर्जुन आवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी परमजीत कदम, योगेश चोपडे, सचिव ओंकार शुक्ला, खजिनदार समीर मुजावर, कुणाल दीक्षित, मिरवणूक प्रमुख विशाल चव्हाण, पूजा प्रमुख सचिन काळे, महेश गायकवाड,
प्रसिद्धी प्रमुख अमोल मिस्कीन, विशाल चंदेले यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी प्रताप चव्हाण, सदानंद येलूर, प्रकाश खुणे, पृथ्वीराज दीक्षित, प्रकाश अवस्थी, सुनील शेळके, सागर पिसे, शैलेश पिसे आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!