crossorigin="anonymous"> नवरात्रोत्सवात देवी भक्तांचे पावित्र्य राखा किसन जाधवांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना – Swarajya News Marathi

नवरात्रोत्सवात देवी भक्तांचे पावित्र्य राखा किसन जाधवांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

0
नवरात्रोत्सवात देवी भक्तांचे पावित्र्य राखा किसन जाधवांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

सोलापूर – शारदीय नवरात्रौत्सवामध्ये देवीभक्त अनवाणी पायाने चालतात कारण हे भक्तीचे आणि नम्रतेचे प्रतीक आहे लवकरच शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे.यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकाराने सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील नादुरुस्त रस्त्यांची डागडुजी कामांना गती आली आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवात विशेषतः सोलापूर शहरात सोलापूरची आराध्य दैवता श्री रूपा भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक हे अनवाणी पायाने पायी चालत मातेचे दर्शन घेत असतात ही खूप वर्षापूर्वी पासूनची परंपरा आहे नवरात्रोत्सवात देवी मातेच्या भक्तांची सोय व्हावी या उद्देशाने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे प्रभागातील नादुरुस्त रस्ता कामाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, जूनियर इंजिनियर शेफाली दीलपाख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इंजिनीयर नदाफ यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक २२ येथील सोनामाता प्रशाला, पटवर्धन चाळ ते गोली वडापाव रस्ता तसेच परिसरातील रस्त्यांचे पाहणी केली या पाहणी दरम्यान किसन जाधव यांनी देवी भक्तांच्या सोयी सुविधाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या नवरात्री सारख्या पवित्र उत्सवावेळी भक्त अनवाणी पायाने नऊ दिवस देवीच्या चरणी स्वतःला समर्थित करीत असतात यादृष्टीने भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

तसेच प्रभाग क्रमांक २२ येथील नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे देखील पाहणी करून काही अडथळे असेल तर ते दूर करावेत अशा सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या. या रस्ता दुरुस्तीच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, दरम्यान अंबादास गायकवाड, युवराज जाधव, सचिन उर्फ अक्षय जाधव, अजिंक्य जाधव, पवन गायकवाड, विद्यासागर उर्फ पिंटू जाधव, मारुती जाधव, मोहन गायकवाड, राज मियाडे, इलाई मियाडे, रिक्षा स्टॉप अध्यक्ष शंकर गायकवाड, श्रीनाथ गुंडाराज जाधव, संदीप जाधव,महादेव गायकवाड गोली वडापावचे मालक श्री जाधव,माणिक कांबळे, फिरोज पठाण, वसंत कांबळे, आनंद गाडेकर, महादेव राठोड आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!