जेमिनी नवरात्रोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रवीण डोळ्ळे

सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास लवकरच प्रारंभ होणार असून या निमित्ताने सोलापूर शहरातील भवानी पेठ, घोंगडे वस्ती परिसरातील भवानी पेठेची माता जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या शारदीय नवरात्र महोत्सव उत्सव काळातील पदाधिकारी निवड संदर्भात अथर्व गार्डन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य दिव्य पदाधिकारी निवड बैठकीदरम्यान श्री महांत कडकोळ महास्वामीजींचे परमशिष्य गुरुवर्य अण्णाराव बिराजदार आप्पाजी यांच्या अध्यक्षतेखाली, मंडळाचे ट्रस्टी नरसप्पा मंदकल, बसवराज भाईकट्टी, सिद्राम तेगळ्ळी, बसवराज जाटगल, लिंगप्पा पुजारी, बंडाप्पा डोळ्ळे, मंडळाचे आधारस्तंभ भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, सिद्रारामय्या पुराणिक, आप्पा शहापुरे, शैलेश मुनाळे, नागनाथ मंदकल, शशिकांत मुन्ना जेनुरे, युवा नेते बिपिन पाटील, प्रवीण कैरमकोंडा, मल्लिनाथ चोपडे, महेश मल्लुरे, मुदका करली, विनायक पाटील, गंगाराम डोळ्ळे, सिद्राम मंदकल,आदींची उपस्थिती होती.
जेमिनी सांस्कृतिक नवरात्र महोत्सव मंडळाचे यंदाचे ५३ वे वर्ष असून नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक, विजयादशमीनिमित्त शक्ती देवीचे भव्य लेझीम पथकाद्वारे मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणुकीत सहभाग नोंदवून अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने बहारदार लेझीमचा खेळ सादरीकरण करण्यात येते. तसेच नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदाच्या वर्षी देखील शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे यावेळी मंडळाचे आधारस्तंभ तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यावेळी या बैठकीदरम्यान बोलताना म्हणाले.
दरम्यान या बैठकीदरम्यान सन २०२५-२६ नवरात्रोत्सव पदाधिकारी निवड एकमताने करण्यात आले यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण डोळ्ळे तर कार्याध्यक्षपदी लिंगराज मासरेड्डी यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष- प्रशांत हलसगि, सचिन मेत्रस, प्रभू कोळी, उपकार्याध्यक्ष-प्रशांत गाडेकर, सरचिटणीस-बसवराज मल्लुरे, चिटणीस-बाळकृष्ण रंगम, अभिजीत करली, खजिनदार-अभिषेक भाईकट्टी, सहखजिनदार-मयूर कोळी, मिरवणूक प्रमुख-अंबादास पुजारी, सह मिरवणूक प्रमुख-राहुल मजगे, लेझीम प्रमुख-अजय कोळी, यल्लालिंग गंजेळी, आकाश कलशेट्टी, डेकोरेशन प्रमुख-रवी मंदकल, प्रसिद्धी प्रमुख-श्रावण आळगे, सिद्ध गणेश कडगुड्डा, स्टेज प्रमुख-अंबादास पाटील, पूजा प्रमुख-सिद्राम यलदडी तर अंबादास कोळी यांची या बैठकीदरम्यान नियुक्त पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आले नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शारदीय नवरात्र महोत्सवाचे पावित्र्य राखत नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करावे असे आव्हान यावेळी परमपूज्य श्री अण्णाराव बिराजदार यांनी या बैठकीदरम्यान केले. मोठ्या खेळीमेळी ही बैठक संपन्न झाली. यावेळी मावळते अध्यक्ष पवन तगारे यांच्या नेतृत्वाखाली सन २०२४-२५ शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडला या निमित्ताने सन २०२४-२५ मधील पदाधिकाऱ्यांचे देखील यावेळी यावेळी विशेष सन्मान करण्यात आले. या बैठकीचे सूत्रसंचालन मल्लिनाथ चोपडे यांनी केले तर आभार बिपीन पाटील यांनी मानले.