रुपाभवानी मंदिरात कुकुमार्चन सोहळा उत्साहात

सोलापूर- कुलस्वामिनी असलेल्या श्री रूपाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाचा पाचव्या माळेला मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती. मंदिरात ललितापंचमीनिमित्त ’कुंकुमार्चन’ विधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महिला भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
शुक्रवारी, पाचव्या माळेला श्री रुपाभवानी मंदिरात पहाटे काकड आरती, सकाळी दहा वाजता श्रीखंड, दही, दूध, पंचामृत व फळांचा अभिषेक करण्यात आली. त्यानंतर रात्री आठ वाजता नित्योपचार पूजा करून छबिना काढण्यात आली. यामध्ये अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसापासून सोलापुरात संततदार पाऊस सुरू असला तरी देवीच्या दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या भक्तीभावाने सहभागी होत आहेत.
यावेळी ट्रस्टी, वहिवाटदार व मुख्य पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.