विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार देवेंद्र कोठे यांची नियुक्ती

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार देवेंद्र कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ….यांनी ही नियुक्ती केली. आमदार देवेंद्र कोठे यांच्या नियुक्तीचे पत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (w) नुसार ही निवड करण्यात आली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या सदस्यत्वाचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत असणार आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर झालेल्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी अभिनंदन केले आहे.