crossorigin="anonymous"> विष्णुपुरी येथे बेलाचे झाड पावसामुळे पडले उन्मळून – Swarajya News Marathi

विष्णुपुरी येथे बेलाचे झाड पावसामुळे पडले उन्मळून

0
विष्णुपुरी येथे बेलाचे झाड पावसामुळे पडले उन्मळून

सोलापूर – प्रभाग 26 मधील विष्णुपुरी येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलाचे झाड उन्मळून पडले होते त्यामुळे विष्णुपुरी तील नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नव्हता. ही बाब माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदर नगरातील रहिवाशी विनायक सादिगले यांनी फोन द्वारे संपर्क साधून समस्या दूर करण्यासाठी सांगितल्या होत्या. त्याची दखल घेत राजश्री चव्हाण यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे व तसेच आपत्कालीन कक्षाचे अधिकारी प्रकाश दिवाणजी यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याने तात्काळ आपत्कालीन व्यवस्थापन कडून जीसीपी उपलब्ध करून देण्यात आले होते.

रात्रीचे दहा वाजेपर्यंत राजश्री चव्हाण यांनी समक्ष उभे राहून सदर नगरातील झाड जे.सी.पी.च्या सहाय्याने बाजूला काढे पर्यंत तेथे उपस्थित होत्या. सदर नगरातील समस्या युद्ध पातळीवर प्रयत्न करून सोडवल्याने तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की.

यावेळी विश्वास जागीरदार, विनायक सादिगले, गणेश सलगरे, विनायक देवकर, पगारे, बिराजदार, बहिरामडगे, व्हना, कोळपे, मोतीवाले, पाटील, नागेश देवकर,ज्ञानेश्वर सादीगले तसेच असंख्य महिला वर्ग उपस्थित होत्या व तात्काळ रात्रीच्या वेळेस त्यांच्या समस्या दूर केल्याबद्दल मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!