सोलापूरचे पालकमंत्री गोरे करणार प्रभाग 26 चा कायापालट

सोलापूर – प्रभाग क्रमांक 26 हा भाग शहराचा शेवटचा भाग म्हणून ओळखला जातो तेथे हद्दवाढ झाल्यापासून जवळपास 25 ते 30 वर्षे होत आलीत परंतु म्हणावा तसा विकास झालेला नाही अनेक नगरे विकासापासून वंचित आहेत. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यापासून अनेक नगराचा कायापालट केला असून उर्वरित नगराचा विकास करावा परंतु नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने व तसेच म.वि.आ. सरकारच्या काळात अडीच वर्षे विकास खुंटला होता अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती.
कालांतराने जनतेच्या मनातील महायुती सरकार स्थापन झाले आणि विकास कामाला गती मिळाली अनेक स्थगिती दिलेले निर्णय रद्द करून सातत्याने जनतेची विकासाची कामे होऊ लागली त्यामुळे जनता सुटकेचा निस्वास सोडला असून तातडीने जनहिताचे निर्णय घेतले जात आहेत.
त्यातच सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या रूपाने भेटले असून विकास कामासाठी सदैव तत्पर असे जनमानसात लोकप्रिय ठरत आहेत.
माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील उर्वरित नगरातील विकास झाला नसल्यामुळे पालकमंत्री यांचे गावी (माण-खटाव) येथे समक्ष जाऊन भेटून सदर समस्या बाबत लेखी निवेदन देण्यात आले होते. पालकमंत्री गोरे साहेब आपले मनोगत व्यक्त केले की आपल्यासारखे जनतेसाठी झटणारे नगरसेवक व ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ते पाठपुरावा करून जनतेच्या समस्या सोडवीत असल्यामुळेच भाजप पक्ष देशात नव्हे तर जगात एक नंबर झाला असून तुम्ही दिलेल्या निवेदनातील नगराला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले आहे.
प्रभाग क्रमांक 26 मधील नगरांचा खुंटलेला विकास होणार आहे त्यात कोरे वस्ती येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे, शाहू वस्ती येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती करणे, राऊत वस्ती येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती करणे. विराट नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती करणे. ए जी पाटील नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. जय महालक्ष्मी नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. समर्थ नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. कल्याण नगर भाग १ व २ येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती करणे. वास्तु विहार नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबती करणे. ज्योती नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याचे पाईपलाईन दिवाबत्ती करणे. मीना नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती करणे. गुरुदेव दत्त नगर भाग १ ते ६ येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. रत्नमंजिरी नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. सुभाष शहा नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. पाटलीपुत्र नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती करणे. उद्धव नगर भाग १ व २ येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती करणे. रेणुका नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. रजनीश रेसिडेन्सी पार्क येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन करणे. पंढरी नगर (शिक्षक सोसायटी) येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती करणे. आदित्य नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. आर्यन रेसिडेन्सी पार्क येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. पंचवटी नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. अश्विनी सोसायटी एस.आर.पी. कॅम्पच्या पाठीमागे येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे.गजानन नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. रक्षक सोसायटी येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. प्रल्हाद नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबती करणे. प्रियांका नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. रेशमा नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. हरी ओम नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. समर्थ सोसायटी एस आर पी कॅम्प जवळील नगरात अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. रोहिणी नगर भाग १ येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. सहारा सोसायटी येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. अण्णा कॉलनी येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. रामनारायण चंडक विहार येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. प्रभाग 26 मधील शेवटचा भाग म्हणून ओळखले जाणारे अमर नगर सोरेगाव येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे.
अक्षय सोसायटी येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. कृष्णा कॉलनी येथे अंतर्गत रस्ते दिवाबत्ती करणे.
अशा अनेक विकासापासून वंचित असणाऱ्या नगराच्या समस्या समक्ष पाहणी करून पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब यांना नगरसेविका सौ राजश्री चव्हाण व भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी समक्ष लेखी निवेदन दिल्याने प्रभाग क्रमांक 26 चा कायापालट होणार.