crossorigin="anonymous"> सोलापूरच्या लाडक्या देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त विशेष वृत्त… – Swarajya News Marathi

सोलापूरच्या लाडक्या देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त विशेष वृत्त…

0
सोलापूरच्या लाडक्या देवा भाऊंच्या  वाढदिवसानिमित्त विशेष वृत्त…

सोलापूर – राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल टाकत वयाच्या २१ व्या वर्षीच राजकारणात दमदार प्रवेश करत सोलापूर महापालिकेत आमदार देवेंद्र कोठे यांनी आपले स्थान निर्माण केले. आपले आजोबा विष्णुपंत कोठे यांचे बाळकडू घेऊन राजकारणात सक्रीय झालेले देवेंद्र कोठे महापालिकेचा कारभार सांभाळल्यानंतर ते आता राज्याच्या राजकारणात आपले वेगळे वलय निर्माण करताना दिसत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापूर शहर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या विकासकामांना गती मिळणे शक्य झाले आहे. आयटी पार्कची घोषणा झाल्यानंतर आता त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे.काही महिन्यांपूर्वी देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पक्षाकडून शहर मध्य मधून आमदारकीची निवडणूक लढवली, तळागाळातील लोकांशी जोडलेली नाळ, युवकांची साथ, केलेले सामाजिक कार्य या जोरावर आणि पहिल्याच प्रयत्नात देवेंद्र कोठे यांना जनतेने आमदार म्हणून निवडून दिले, आमदार देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे आमदार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे सध्या शहर मध्य मध्ये काम करत असून शहर मध्य चा विकास करण्याचे ध्येय आमदार देवेंद्र कोठे यांनी बांधले आहे, तसेच शहरातील विमानसेवा सुरू करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केंद्रीय उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सतत पाठपुरावा करत विमानसेवेचा प्रश्न सोडवला, तसेच शहरात लवकरात लवकर आयटी पार्क सुरू करून शहरातील युवकांना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध द्यावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत.आमदार देवेंद्र कोठे यांना पाहिलयापासूनच सामाजिक कार्याची आवड होती, त्यामुळे त्यांनी स्व राजेश कोठे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले, या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक शिबिरे, गरजू लोकांना शालेय वैद्यकीय मदत आमदार देवेंद्र कोठे यांनी केली, हळूहळू पुढे त्यांनी स्व विष्णुपंत कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला, यावेळी पहिल्यापासून राजकारणात असलेले स्व महेश कोठे यांचे मार्गदर्शन आणि साथ त्यांना मिळाली.देवेंद्र कोठे यांनी केलेले समाजकार्य त्यामुळे, पहिल्याच प्रयत्नात देवेंद्र कोठे हे नगरसेवक झाले, तसेच नगरसेवक म्हणून काम करण्यास मिळालेल्या संधीचा त्यांनी लोक उपयोगासाठी फायदा करून घेतला, देवेंद्र कोठे हे नगरसेवक असताना प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी घरापर्यंत जायचे आणि तात्काळ अडचणी दूर करत होते, त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी देवेंद्र कोठे हे आपल्याच घरातील व्यक्ती वाटू लागले, जनतेसाठी केलेलं काम आणि जनतेच्या सुख दुःखात कायम सोबत राहिल्याने जनतेने त्यांना दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले.
दरम्यान, आमदार देवेंद्र दादांना ३५ वर्ष पूर्ण होत आसुन महानगरपालिकेत केलेली दमदार एन्ट्री व दोन टर्म कर्तव्यदक्ष नगरसेवक हा कार्यकाळ पूर्ण करून,लोकसभा निवडणुकीत केलेली दमदार बॅटिंग व योगी आदित्यनाथ यांच्या सभेतील ते हिंदुत्ववादी आक्रमक भाषणाने सर्वांची मने जिंकून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांची व विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची नजर देवेंद्र दादांवर पडली व त्याच वेळी ठरले की शहर मध्य विधानसभेचा उमेदवार हे देवेंद्र दादा असतील यावर शिक्कामोर्तब झाला होता.सोलापूर शहरातील भाजपच्या राजकीय प्रवासात,आज अनेक नेत्यांनी योगदान दिले,आमदार देवेंद्र दादानी खूप कमी वेळेत भाजप समजून घेतला असे आज अनेक भाजपचे ज्येष्ठ नेते बोलताना दिसतात,कारण हिंदुत्ववादी विचारधारा तशी २०१९ लोकसभा निवडणुकीत डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारादरम्यान शिवस्मारक येथे केलेल्या भाषणादरम्यान दिसून आलेलीच होती,मात्र याच बरोबर सोलापूर शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार करीता एक युवा अभ्यासू नेतृत्वाची गरज होती ही गरज भरून काढण्याचे काम देवेंद्र दादानी आमदार झाल्यानंतर आपल्या १० महिन्याच्या कालावधीत केलेल्या कार्यशैलीवरून दिसून येते,सोलापूर शहराच्या नागरिकांसाठी महत्वपूर्ण असलेला पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून दुहेरी पाईप लाइन करीता अपुऱ्या निधीमुळे प्रलंबित होता,हा विषय अधिवेशनात मांडून शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविला व पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या मदतीने पाणी प्रश्नाबरोबर विमानसेवेचा विषय सोडविण्यात देखील महत्वपूर्ण भूमिका निभावली यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जाताना भाजप म्हणून केलेली सदर कामाची यादी जनतेसमोर घेऊन जाण्याची एक संधी मिळाली असून,लोकसभेला विरोधकांनी केलेल्या दिशाभूलने मोठा फटका बसला होता याला जर दुरुस्त करायचे असेल तर, पॉझिटिव्ह गोष्टी जनतेसमोर घेऊन जाणे गरजेचे आहे,याची जाणीव लक्षात ठेऊन दादानी पाठपुरावा करून शहरातील महत्वाचे कामे मंजूर घेतली आहेत.सोलापूरच्या तरुणांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला,रोजगाराचा प्रश्न देखील मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब,पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या मदतीने लवकरच सोडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून,आई बापांपासून दुरावलेल्या लेकरांना पुन्हा आपल्या घरी परत घेऊन येण्याचे काम देखील देवेंद्र दादा नक्कीच करतील हा विश्वास वाटतो, व दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की दादांसारखे कर्तृत्ववान युवा नेत्याला उदंड आयुष्य लाभो, व सोलापूर शहराच्या विकासासाठी त्यांची सुरू असलेली धडपड व सोलापूरचे सुजलाम,सुफलाम करण्यासाठी असलेली तळमळ पाहता त्यांच्या प्रत्येक कार्यास यश प्राप्ती होवो हीच प्रार्थना…शहर मध्य मधून आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष वृत्तांत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!