पंचमुखी मंडळाची मेनका राठोड यांच्या हस्ते पूजा करून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

सोलापूर – विजापूर रोड परिसरातील मानाचा पंचमुखी कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गणपतीचे विसर्जन मिरवणुकीचे माजी नगरसेविका तथा सभापती मेनका राठोड यांच्या हस्ते पूजा करून व माजी सहाय्यक महसूल अधिकारी सोलापूर शिवराज राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.
विजापूर रोड परिसरातील अकरा नगर एकत्र येऊन 23 वर्षाखाली स्थापन झालेल्या या मंडळाच्या मिरवणुकीत पुरुष व महिला एकत्र येऊन लेझीमचे अनेक बहारदार डाव सादर केले.या गणपती मंडळास अनेक शासन पुरस्कार प्राप्त असून प्रत्येक वर्षी मंडळ अनेक समाजपयोगी कार्यक्रम घेतात.रक्तदान शिबिर,लहान व मोठा गटासाठी अनेक खेळाचे स्पर्धा ,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,संगीत खुर्ची,लिंबू चमचा असे अनेक समाज व लोकोपयोगी कार्यक्रम या आठ दहा दिवसात घेण्यात आले.
आजपर्यंत कुठलेही गालबोट न लागता शांत व शिस्तबद्ध पद्धतीने सगळे कार्यक्रम पार पडले.2025 च्या उत्सवात 400 मुलामुलींचे भव्य लेझिम ताफा ,पारंपरिक कला प्रकाराचे दांडपट्टा,लाठी काठी, तलवारबाजी असे तरुणांनी विविध प्रकारचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे यावर्षी मिरवणुकीत शेष नाग, शंकर पार्वती व बारा ज्योतिर्लिंगचे भव्य देखावा सादर करण्यात आला. व गेल्या वर्षीचे सन 2024 विजापूर रोड परिसर मध्यर्ती उत्सव समितीकडून मंडळास प्रथम पारितोषिक मिळाल्याने जल्लोष करण्यात आला व प्रथम पारितोषिक मिळाल्याने माजी नगरसेविका तथा सभापती मेनका राठोड व माजी महसूल सहायक अधिकारी शिवराज राठोड यांनी मंडळ, अध्यक्ष व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .