नागपंचमीनिमित्त महिलांसाठी बांधण्यात आला झोका

सोलापूर – नागपंचमीचे अवचित साधुन जुळे सोलापुरातील उद्धव नगर भाग एक येथील प्रसिद्ध जागृत मंदिर म्हणून संबोधले जाणारे श्री लक्ष्मी समर्थ मंदिर प्रांगणात झोका बांधून त्याचे उद्घाटन प्रभाग 26 च्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण व प्राप्ती आकाश अलकुंटे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
दिनांक 29 जुलै रोजी महिलांचा महत्त्वकांक्षी व आनंदाचा क्षण म्हणजेच नागपंचमी सण यानिमित्ताने प्रत्येक घरात नागदेवतेची पूजा करून आदल्या दिवशी भावासाठी उपवास करीत असतात.
प्रत्येक महिला नागपंचमीचा सण आसल्यामुळे रात्रभर मेहंदी हाताला लावून तसेच नागपंचमी सणासाठी पुरणपोळी, करंजी असे अनेक पदार्थ करून रात्रभर मोकळ्या जागेत पिंगा फुगडी खेळून फेर धरत असतात त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून आले.
यावेळी श्री लक्ष्मी समर्थ ग्रुपच्या सर्वेसर्वा ज्योती मनोजकुमार अलकुंटे, योग शिक्षिका स्वाती शिंदे, अर्चना अचलेर, अनिता माने, पुजारी, व श्री लक्ष्मी समर्थ ग्रुप मधल्या सर्व सेवेकरी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.