शहरातील रास्तभाव दुकानदार डिजीटल इंडिया पासून दूर का ?

सोलापूर – भारताचे पंतप्रधान अगदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी सत्तेवर येण्याअगोदर आणि आल्यानंतर भ्रष्ट्राचार मुक्त स्वच्छ भारत करण्याची घोषणा केली. त्यानुसार डिजीटल इंडियाचा मोठा प्रवास त्यांनी सुरू केला. सर्वसामान्य नागरिकांना दलालापासून मुक्ती मिळावी म्हणून डिजीटल इंडियामध्ये ऑनलाइनच्या मान्यमातून संपूर्ण भारताची शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत पासून संपूर्ण भारत ऑनलाईन मध्ये समावेश करून आपल्या हातातील मोबाईल मध्ये भाररताचे दर्शन घडवून आणत असताना सोलापुरातील सरकारमान्य रास्तभात दुकानदार या ऑनलाईन पासून दूर का ? याचा खुलासा शहर अन्नधान्य नागरीक पुरवठा कार्यालयाकडून झाला पाहिजे. कारण रास्त भाव दुकानदार हे आदरणीय पंतप्रधान यांचे आदेशाचे उल्लंघन करतआहेत, याची गंभीरतेने दखल घ्यावी अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समितीची आहे.
तसेच महाराष्ट्र सरकार कडून रास्त भाव दुकानातून साडीचे वाटप करण्यात येणार आहे, तेव्हा दुकानदारांकडून पोच पावती देण्याचे आदेश द्यावेत, तसेच लाभधारकाची यादी दुकानात ठेवण्यात यावी.
यावेळी अध्यक्ष खाजाहुसेन अत्तार, उपाध्यक्ष लक्ष्मण वडलाकोंडा, सरचिटणीस रियाजअत्तार, रविकांत ममदापूरे आदि उपस्थित होते.