वादग्रस्त आमदारांना विद्यापीठाच्या कार्यक्रमास आणणे टाळावे

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापना दिनानिमित्त कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पत्रिका दुरुस्त करून महाराष्ट्र विधानसभा वादग्रस्त सदस्य गोपीचंद पडळकर यांना 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमास आमंत्रण दिले आहे. अश्या वादग्रस्त आमदारांना कार्यक्रमास आणणे टाळावे असे निवेदन कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांना ई-मेल द्वारे सिनेट व स्थायी समिती सदस्य गणेश डोंगरे यांनी दिले.
देशात स्वातंत्र जिल्हासाठी असणारे एकमेव विद्यापीठ म्हणजे सोलापूर विद्यापीठाची ओळख आहे. विद्यापीठातून हजारो, लाखो विद्यार्थी पदवी पुर्ण करतात. वर्धापन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सर्व अधीसभा सदस्य यांना देण्यात आले. परंतु त्या पत्रिकेत आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव नव्हते आणि दोन दिवस अगोदर व्हाट्सअप विद्यापीठ ग्रुपला प्रशासनाने पत्रिकेवर आमदार पडळकर यांचे नाव घालून पत्रिका पाठवली आहे. असे अचानक नाव घालून वादग्रस्त आमदारला बोलवणे या मागचा नेमका उद्देश काय आहे हे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट करावे.
राजमाता अहिल्यादेवीच्या नावाने असलेल्या विदयापीठ वर्धापन कार्यक्रमात वादग्रस्त वक्तवे होऊ नये याची काळजी व जवाबदारी स्वतः कुलगुरू यांनी घ्यावी आणि यापुढे विद्यापीठात कोणत्याही कार्यक्रमास वादग्रस्त आमदारांना टाळावे.