शेतकऱ्याचा अंत पाहू नका, सरसकट पंचनामे कर; नुकसान भरपाई द्या… खा.प्रणिती शिंदे यांचा पाहणी दौरा

सोलापूर – जिल्ह्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातले असून गाव, वाड्या, वस्त्या, नाले, ओढे सह सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिक, शेतकरी भयभित झाले आहेत. शेतकऱ्याचे उडीद, सूर्यफूल,
सोयाबीन आदी पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झालेले आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने मोहोळ तालुक्यातील पूरस्थिती असलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची बांधावर जाऊन भरपावसात पाहणी केली.
तालुक्यातील डिकसळ, मसले चौधरी, खुनेश्वर या परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्वरित प्रशासनाने शेतकऱ्याचे अंत न पाहता सरसकट पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांचे हाल पूरग्रस्त स्थिती पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.उद्या या भागातील शेतकऱ्यासह मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार,मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश पवार, अरुण पाटील उपस्थित होते.
यावेळी बाधित शेतकरी कृष्णा यादव, सुजाता धावणे, संतोष यादव, हनुमंत धावणे, नानासाहेब राऊत, सुरज यादव, युवराज यादव, विवेकराज धावणे, शिवम धावणे, विष्णू यादव, महेश यादव, स्वाती धावणे, चंद्राहार धुमाळ, तानाजी धावणे, सत्यवान धावणे, आदी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी बंडू थिटे, दिलीप धावणे, अरुण पाटील, तानाजी शिंदे, दीपक शिरसाट, दिनकर पोटरे, वसंत चव्हाण, लक्ष्मण मगर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.