माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात भोजनाचे आयोजन

सोलापूर – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी गोपाळपूर ता.पंढरपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना, मातापित्यांना सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गोड जेवणाचे आयोजन पंढरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतराव मोरे यांनी केले होते.
यावेळी मातोश्री वृध्दाश्रम परिसरात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर सर्व मातापित्यांना गोड जेवण देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि सुशीलकुमार शिंदे यांना ईश्वर उदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना त्यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले की सुशीलकुमार शिंदे यांचे कर्तुत्व हे खूप महान आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, अर्थमंत्री, राज्यपाल, देशाचे ऊर्जामंत्री, गृहमंत्री आणि एवढेच नव्हे तर जगाच्या पातळीवर युनो मध्ये जाऊन देशाचे प्रतिनिधित्व केले. अशा या महान नेत्याला सर्वांचे वतीने शुभेच्छा देऊ आणि पांडुरंग त्यांना उदंड आयुष्य देवो अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.
जिल्हा उपाध्यक्ष अँड. अर्जुनराव पाटील, सिद्राम पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. १०० लोकांना गोड जेवण देऊन स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दल पंढरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, सुरेश आप्पा शिवपुजे, सिद्राम पवार, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी, उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, नागनाथ आधटराव, मिलिंद आडवळकर, बाळासाहेब आसबे, देवानंद इरकर, हनुमंत नाईक -नवरे, दत्तात्रय बडवे, शेखर मोरे बाळासाहेब जाधव, पिंटू आडगळे आदी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(s.sir