काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी सुशील बनपट्टे

सोलापूर – काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष सुशील बनपट्टे यांची सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. याचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यावेळी त्यांचा सत्कार ही शिंदे यांनी केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शिफारशीनुसार खासदार प्रणिती शिंदे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार सुशील बनपट्टे यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या पत्रामध्ये आपण काँग्रेस पक्षाचे धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी, माजी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असे आहे.
येणाऱ्या काळात सोलापूर शहर काँग्रेस पक्ष बळकट व मजबूत करण्यासाठी प्रयत्न असेल. सर्वांसोबत राहून, सर्वांना पुढे नेण्याचा प्रयत्न करेन व सर्व सामान्य जनतेपूर्व पर्यंत पोहोचून त्यांच्यासमस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशीमाहिती सुशील बनपट्टे यांनी दिली.
यावेळी राजकुमार कलकेरी, दीपक जाधव, महेश अलकुंटे, दत्तात्रय अलकुंटे, संतोष इरकल, गोपाळ पाथरूट, श्याम मुद्दे, अशोक यमपूरे, भीमाशंकर बंदपट्टे, श्रीनिवास यमपूरे, जयवंत यमपूरे, राहुल भरले, अतिश अलकुंटे, कुणाल भांडेकर, नरेंद्र अलकुंटे व समस्त वडार समाज व चंद्रनील मित्र परिवार उपस्थित होते.