देशहितासाठी संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकांचे ध्येय – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार

सोलापूर – देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राऊंड टेबल मूकबधिर निवासी शाळा मोहोळ येथील मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
भारत देशाच्या विकासासाठी संस्कारक्षम विद्यार्थी घडवून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सकृती असलेले समाज निर्माण करण्याची गरज असून शिक्षकांनी असे विद्यार्थी घडवावे अशी आवहान सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री सातलिंग व शटगार यांनी मोहोळ येथील मूकबधिर शाळेत देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव शाहीन शेख यांनी आयोजित केलेल्या राऊंड टेबल मूकबधिर निवासी शाळा मोहोळ येथे शैक्षणिक साहित्य वाटपा प्रसंगी बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, शहराध्यक्ष किशोर पवार, उपाध्यक्ष राजेश पवार, सुरेश शिवपुजे,सिद्राम पवार,आमजद शेख, बिरा खरात, महिला अध्यक्ष अंजली वस्त्रे, रतन डोळसे आदी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक वैभव शेटे सर यांनी केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार मूकबधिर विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शाहीनताई शेख यांनी केले होते.
याप्रसंगी शाहीनताई शेख यांच्या वतीने मूकबधिर शाळेस खुर्च्या व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश सचिव शाहीनताई शेख,मोहोळ तालुका सुलेमान तांबोळी, शहराध्यक्ष किशोर पवार,सिद्राम पवार,शाळेचे मुख्याध्यापक वैभव शेटे आदींनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास अमजद शेख, राजेंद्र सर्जे, निजाम शेख, संतोष शिंदे, कृष्णदेव वाघमोडे, बिरा खरात,अंजली वस्त्रे, रतन कसबे, सारिका गवळी, आयोशा शेख,नफिसा शेख,आलका डोकडे आदीसह मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार देशमुख सर यांनी मानले.