कुलगुरू भष्टाचारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी – सिनेट सदस्य गणेश डोंगरे

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू भष्टाचारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी केला आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 36 वी अधिसभा टेंडर प्रक्रिया,इडूलॅब सॉफ्टवेअर,पीएच.डी पदवी, विद्यार्थ्यांची परिक्षा फी माफी, सभेचे इतिवृत्तामधील चुकांनी गाजली.
3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अधिसभा बैठकीत प्रश्न उत्तर च्या तासिकेत सिनेट सदस्य अजित संगवे यांनी विचारलेल्या विद्यापीठाने कबड्डी, तायक्वांदो, कराटे साठी मागविलेल्या मॅटवरील टेंडर प्रक्रियेमध्ये भष्टाचार झाला या प्रश्नावर सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी उपप्रश्नानात सभागृहात झालेल्या भष्टाचारात सर्व पुरावे सभागृहात सादर केल्यानंतर एकच गोंधळ उडाला.विद्यापीठ अधिकारी यांनी मित्राच्या फोन पेचा स्कॅनर पाठवून दहा हजार रुपये संबधीत कंपनीकडून घेतले यावर चौकशी समिती नेमावी .त्यावेळेस कुलगुरू यांनी व्यवस्थापन परिषद समोर हा विषय न आणता परस्पर संबधीत कंपनीने विद्यापीठाला केलेल्या ईमेल वरूनच चौकशी समिती नेमून विद्यापीठ अधिकाऱ्याला क्लीन चीट देण्यात आली.यावर सभागृहातील सर्व सदस्यांनी गणेश डोंगरे यांनी सादर केलेल्या पुराव्यावर चौकशी समिती नेमावी.त्यावर कुलगुरू यांनी विद्यापीठ अधिकाऱ्याला पाठीशी घालत या विषयाचा बचाव केला.
अधिसभा चालू होण्यापूर्वीच सभागृहात सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी सोलापूरात अतिवृष्टी पूरग्रस्त परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परिक्षा शुल्क फी माफ व्हावी.त्याशिवाय अधिसभा चालू करायची नाही याचा आग्रह धरला.त्यावर कुलगुरू यांनी थोड्याच वेळात उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत ऑनलाईन मीटिंग झाल्यानंतर लंच टाइम नंतर आपणास सांगण्यात येईल असे सांगितल्यावर अधिसभेची सुरुवात झाली.मंत्री चंद्रकांत पाटील यांची मिटींग समाप्त झाल्यानंतर कुलगुरू यांनी लवकरच परीक्षा शुल्क फी माफीचे परिपत्रक निघेल असे सभागृहास सांगितले.
तसेच विद्यापीठाचे पी.एचडी धारक विद्यार्थी लक्षमण ढोबळे व महेश चोप्रा यांच्याबाबत परिक्षेस लेखनिक घेतल्याबाबत सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी सभागृहात चौकशी समिती नेमली होती. त्यावर कुलगुरू यांनी चौकशी समितीचा अहवाल सिनेट सभागृह, व्यवस्थापन परिषद समोर न मांडता क्लीन चीट देऊन त्या संबंधित विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. हा सर्व अनगोंदी कारभाराला कुलगुरू पाठीशी घालत आहेत असा आरोप गणेश डोंगरे यांनी केला.