रे नगरमुळे डोक्यावर छत मिळालं – काशिनाथ गोरे यांची कृतार्थ भावना

सोलापूर – “एमआयडीसी परिसरात एक सामान्य यंत्रमाग कामगार म्हणून काम करत होतो. सुरुवातीला भाड्याच्या घरात राहावं लागायचं. मास्तरांनी मला घरकुल योजनेचा लाभ घ्या म्हणून कार्यालयात बोलावले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी ‘रे नगर’ गृहप्रकल्पाचा सभासद झालो. केंद्र व राज्य शासनाकडून मिळालेल्या ₹२.५ लाखांच्या अनुदानासोबत माझा स्वतःचा ₹२.६ लाखांचा हिस्सा जमा करून एकूण ₹५.१० लाख रुपये किमतीचे हक्काचे घर मला मिळाले.” — अशी कृतज्ञ भावना रे नगरचे लाभार्थी श्री. काशिनाथ गोरे यांनी व्यक्त केली.
“एकरकमी रक्कम भरण्याची ऐपत नसल्यामुळे बँकेकडून कर्ज घेण्यात आले. ते मी तीन वर्षांत पूर्ण परतफेड केले. परतफेडीनंतर कार्यालयात बोलावून मला माझ्या घराची सर्व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मास्तरांमुळेच मला डोक्यावर मालकीचे छत मिळाले; त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही,” असेही ते म्हणाले.
तसेच, गोरे यांनी इतर लाभार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले की, “राष्ट्रीयकृत बँकांमार्फत मिळणारे अल्पदरातील गृहकर्ज वेळेच्या आत परतफेड करणे काही अवघड नाही. अनेक सहकारी व्याजदरांच्या भीतीने कर्ज घेण्यास कचरतात. पण रे नगरच्या माध्यमातून जामीनदाराशिवाय अत्यल्प व्याजदरात गृहकर्ज मिळाले, ही एक सुवर्णसंधी आहे. प्रत्येकाने गरजा मर्यादित ठेवून वेळेत कर्जाची परतफेड करून आपले मालकी हक्काचे घर मिळवावे.”
या प्रसंगी रे नगरचे सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर), ॲड अनिल वासम, व्यवस्थापक गजेंद्र दंडी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.