जबरी चोरी करणारा आंतरराज्य गुन्हेगार पोलिसांच्या अटकेत

सोलापूर – जबरी चोरी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार पोलिसांनी अटक केला आहे. त्याच्याकडून ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र सोलापूर शहर गुन्हे शाखेने हस्तगत केले आहे.
तक्रारदार नामे मीरा एस. शिवाजी ऊबाळे वय-६३ वर्बे व्यवसाय गृहिणी रा. घर नं. १9२. फस्ट मेन थर्ड कॉर्स बसवलिंगाप्पा नगर. विदयारण्याप्रा, जिल्हा बंगलूर राज्य कर्नाटक या आपले कुटुंबासह ‘तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या देवदर्शन आटोपुन त्या परत बंगलूर शहराकडे जाण्यासाठी वि़ २० जुलै २०२५ रोजी दुपारी ४:३0 वा.चे सुमारास रेल्वे स्टेशन सोलापूर येथील महात्मा गांधी प़तळयाजवळ आल्या असता, दोन इसमांनी मोटार सायकलवरुन येवून, तक्रारदार मीरा ऊबाळे यांचे गळयातील, समारे ०५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन घेवून, ते आपल्या मोटार सायकलवरुन निघून गेले.
सदर घटनेबाबत मीरा एस. शिवाजी ऊबाळे वय-६३ र्षे, व्यवसाय . गृहिणी रा. घर नं ११२, फस्ट मेन थर्ड कॉर्स, बसवलिंगाप्पा नगर, विदयारण्यापुरा, जिल्हा बेंगलूर राज्य कर्नाटक ‘ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर शहर ‘ येथे गुन्हा रजि नं. ६१७२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०९(), ३(५) प्रमाणे ‘गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे घटनास्थळास गुन्हे शाखेचे व.पो.नि सूनिल दोरगे, स.पो.नि. शैलेश खेडकर व पथकाने भेट दिली व आज्ू बाजूचे परिसराचे निरीक्षण केले. सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार, राजकुमार पवार यांनी घटनास्थळ परिसर व आरोपीतांचे घटनास्थळावरुन गुन्हा करुन निघून जाण्याचे मार्गावरील सी.सी.टी.वही फटेजची अत्यंत बारकाईने पाहणी करुन, सदरचा गुन्हा करणारे इसमांबाबत अत्यंत कमी कालावधीत, कौशल्याने तांत्रीक माहिती मिळवली. सपोनि शैलेश खेडकर व पथकाने सदरचा गुन्हा करणारे इसमांबाबत गोपनीयरित्या माहिती धेवून, गुन्हा त्यांनीच केला असल्याबाबत खात्री केली.
त्यानंतर दि. 27 जुलै रोजी स.पो.नि.शेलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत चैन स्नँचर नामे अलिरजा उर्फ अलिरजाक उर्फ लल्ला शेखू बेग (ईराणी), वय-३१ वर्षे, रा.शिवाजी नगर, टी.पी.एस रोड, परळी जि. बीड याने त्याचे इतर साथीदारांसह मिळन केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच तो दुपारचे वेळेस लातूर शहरातील सम्राट चौकातील, महाराष्ट्र टायर्स या द्कानात येणार आहे, अशी ‘देखील खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी, लातूर शहरात जावून दुपारचे वेळेस सम्राट चोक लातूर येथे सापळा लावून, रेकॉर्डवरील सराईत चैन स्नँचर नामे अलिरजा उर्फ अलिरजाक उर्फ लल्ला शेखू बेग (ईराणी), वय-३9 वर्बे, रा. शिवाजी नगर, टी.पी.एस रोड, परळी जि. बीड यास ताब्यात घेतले. त्यानंतर, सपोनि शेलेश खेडकरव पथकाने त्याचेकडे कोशल्याने तपास केला असता, त्याने साथीदारांसह सोलापूर शहरात येवून, रेल्वे स्टेशन येथील चौकात मंगळसुत्र चोरीचा गुन्हा केल्याबाबत कबूली दिली. त्यामुळे त्यास अटक करण्यात आली.
तपासा दरम्यान त्याने चोरी केलेले सुमारे ०५ तोळयाचे मंगळसुत्र देखील काढून दिल्याने, ते मंगळसुत्र आरोपीकडून हस्तगत करण्यात आले. सपोनि शैलेश खेडकर व पथकाने अल्पावधीतचं आंतंरराज्यीय ईराणी टोळीतील गुन्हेगाराची कौशल्याने माहिती काढून, त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून, अटक करुन, गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करुन, जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद महाराष्ट्र व उत्तरप्रदेश राज्यात चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी एम.राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे, राजन माने, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावले, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे तरसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व म च्छिंद्र राठोड यांनी केली आहे.