अन्न औषध प्रशासनाची अचानक धाड, जप्त केला मुद्देमाल

सोलापूर – दिनांक 31 जुलै 2025 रोजी साहेबराव देसाई, सहायक आयुक्त (अन्न) तसेच अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी व उमेश भुसे यांच्या पथकाने बार्शी येथील 1. रिझवान रहिमान तांबोळी यांच्या मालकीचे मे. ए.एच ट्रेडर्स, लता टॉकिज शेजारी, बार्शी, जि. सोलापूर व 2. किरण शंकर कल्याणी यांच्या मालकीचे मे. गजानन ट्रेडर्स, लगतचे घर आडवा रस्ता, गणपती मंदिर जवळ, बार्शी, जि. सोलापूर या दोन पेढीवर अचानकपणे धाड टाकली.
या पेढीतुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा (बादशाह, के आर गुटखा, आर एम डी पान मसाला, विमल पान मसाला, डायरेक्टर, सुगंधित सुपारी इत्यादी ) एकूण जप्त साठ्याची एकत्रिंत किंमत रुपये 1,58,524/- चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला.
तसेच सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी यांनी पुढील कारवाई घेऊन 1. रिझवान रहिमान तांबोळी, 2. पुरवठादार तांबोळी, 3. पुरवठादार शेख, 4. पुरवठादार मिलन, 5. किरण शंकर कल्याणी, 6. पुरवठादार राम डोंबे, 7. पुरवठादार तांबोळी यांच्याविरुध्द बार्शी पोलिस स्टेशन, बार्शी येथे फिर्याद दाखल करण्यात आलेले आहे. त्याचा क्रमांक 605/2025 असा आहे.
सदरची कारवाई साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी व उमेश भुसे यांच्या पथकाने पुर्ण केली.