कर्मचाऱ्यांना पूर्वी प्रमाणेच विमा मेडिकल कॅशलेस लागू करा

सोलापूर – भारतीय स्वातंत्र्य (१५ऑगस्ट) दिनाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात महापालिका आयुक्त सचिन उंबसे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सोलापूर महापालिकेत कार्यरत असणाऱ्या सर्व विभागातील अधिकारी, मानधन रोजंदारी, बदली कर्मचाऱ्यांच्या एक महिन्याच्या वेतनातून ५०० रुपये कपात करून वरील सर्व कर्मचाऱ्यांना विमा मेडिकल कॅशलेस लागू करून वरील कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
आकृतीबंध दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी मंजूर झाला असून तो वर्ग ४ कर्मचाऱ्यांना वर अन्याय कारक असून त्या आकृतीबंध मध्ये बिगारी, झाडूवाला, चावीवाला सफाई कर्मचारी डेरणेज बिगारी यांच्यावर अन्याय झालेला आहे तरी दिनांक १/०७/२०२५ रोजी आपण काढलेल्या आकृतीबंध दुरुस्ती परीपत्रकामध्ये सोलापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आरोग्याचा विचार करून वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांची ५०० नवनिर्मिती पदे तयार करून दिनांक ०६/०४/१९९५ नंतरच्या उर्वरित २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा मार्ग मोकळा करून न्याय द्यावा.
आय.सी.टी. बेस्ट प्रणाली मार्फत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन न करणे बाबत क्युआर कोड स्कॅन सक्ती रद्द करणे. सोमपा मधील कायम कर्मचाऱ्या प्रमाणेच बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना खाकी कपडे मिळावे. सोमपा बदली,रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन १०० रुपये प्रमाणे वेतनात वाढ करावी. सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता लागू करावा.
३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक वेतन२०२३/प्र.क्र.१३ सेवा- ३मंत्रालय दिनांक२८/०६/२०२३ शासन परिपत्रकानुसार सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करणे संदर्भात संबंधित विभागास आपले आदेश व्हावेत. मनपा कर्मचाऱ्यांना शासन प्रमाणे भविष्य निर्वाह निधीची माहिती online app वर माहिती उपलब्ध करून देणे बाबत.
या मागण्यासंदर्भात आयुक्त डॉ.सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाली या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या हिताची भूमिका घेणार असल्याचे ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, सचिव विठ्ठल सोनकांबळे, प्रमुख मार्गदर्शक इकबाल तडकल,कार्याध्यक्ष योहान कानेपागुल, खजिनदार अरुण म्हेत्रे, सहसचिव रामचंद्र चंदनशिवे, प्रमुख संघटक सायबण्णा हदिमनी, शिवराज शिंदे सुनील शिंदे धनाजी लोंढे, संतोष गायकवाड बिबीशन गायकवाड, व बदली रोजंदारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.