crossorigin="anonymous"> प्रभाग ९, ११, १२, व १३ ची प्रभाग रचना अव्यवहार्य व अन्यायकारक… – Swarajya News Marathi

प्रभाग ९, ११, १२, व १३ ची प्रभाग रचना अव्यवहार्य व अन्यायकारक…

0
प्रभाग ९, ११, १२, व १३ ची प्रभाग रचना अव्यवहार्य व अन्यायकारक…

सोलापूर – प्रभाग ९, ११, १२, व १३ ची प्रभाग रचना अव्यवहार्य व अन्यायकारक आहे यावर आम्ही हरकत घेणार असल्याचे ऍड. सुरेश गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करिता राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना ३/९/२५ रोजी संकेत स्थळावरून प्रसिद्ध केली आहे. शहर सोलापूर महापालिके करिता एकूण १०२ सदस्य निवडून देण्याचे असून त्याकरिता २६ प्रभागात विभाजन करणेत आले आहेत.

यामध्ये कसबे सोलापूर मधील प्रभाग क्र.९,११,१२,१३ या प्रभागाची रचना अत्यंत अव्यवहार्य, अन्यायकारक असून नैसर्गिक न्याय तत्वाला तिलांजली देणारी आहे. या चार ही प्रभागाची सिमारेखा ठरविताना मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम.५ , व ५अ ला पूर्णपणे छेद दिला आहे. प्रभागाच्या सिमाचे विभाजन करताना मुख्य रस्ता, नैसर्गिक मर्यादा,नागरिकांचे हित, भाषीक समतोल , अस्तित्वात असणाऱ्या निवासी वसाहतीची रचना , लोकसंख्येचे प्रमाण याचा कोठेही विचार केला नाही. यापूर्वी २०१७ ला असलेली रचना पुन्हा कायम केली आहे.त्यामुळे सदस्य निवडीतील रोटेशन खंडीत झाले आहे .

विशेषतः कर्णीक नगर , एकता नगर,पद्मा नगर , स्वातंत्र्य सैनिक नगर, सुतमिल परिसर , एम.आय डी सी परिसर आदी वसाहतीचे तीन प्रभागात विभाजन करून अत्यंत विस्कळीतपणा केला आहे. ही रचना अव्यवहार्य व अन्यायकारक आहे. याबाबत आपण स्थानिक नागरी समुह आणि . प्रबोधन सेना यांच्या वतीने रविवार दि. ७/९/२५ रोजी शनि मंदिर, कर्णिक नगर येथे सकाळी १०.वा नागरिकांची प्रभाग सभा घेऊन हरकतीचा मसुदा ठरवून आव्हान देणार असल्याचे ॲड.सुरेश गायकवाड यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!