गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी… रस्ते दुरुस्ती व विसर्जनस्थळाची तयारी अंतिम टप्यात

सोलापूर : आगामी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे यांनी शहरतील निघरणाऱ्या गणेशउत्सव मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी हिप्परगा खान येथील विसर्जन स्थळालाही भेट देऊन तयारीची पाहणी केली.यावेळी नगर अभियंता सारिका आकुलवार व सहायक अभियंता श्री. दिवाणजी यांच्या सह संबंधित विभागचे अधिकारी उपस्थिती होते.
मिरवणुकीदरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवणे,पावसाळ्यात चिखल होणार नाही यासाठी हिप्परगा खान विसर्जन स्थळावर आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबतही विभागीय अधिकारी सूचनाही देण्यात आल्या तसेच. साफसफाई व विसर्जन ठिकाणी पुरेसं प्रकाशयोजना यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी संबंधित विभागाला दिले.
गणेश विसर्जन हा शहरातील मोठा सांस्कृतिक व धार्मिक सोहळा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वाहतुकीची सोय, प्रकाशयोजना, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेच पोलिस विभागासोबत समन्वय ठेवून आवश्यक ती कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश नियंत्रण अधिकारी यांना अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिले.