मनसे वाहतूक सेनेच्या तालुका उपसंघटकपदी विठ्ठल बंडा आणि समर्थ माळगे

सोलापूर – आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात येत असून वाहतूक सेनेच्या तालुका उपसंघटक पदी विठ्ठल बंडा आणि समर्थ माळगे यांची निवड जाहीर करण्यात आली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर आणि वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर तसेच शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर यांच्या हस्ते जिल्हा कार्यालय येथे दोघांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
विठ्ठल बंडा आणि समर्थ माळगे हे दोघे मागील दहा वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत.रिक्षा सेनेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते करत असतात.त्यांच्या कार्याची दखल घेत वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.