पंचनामे तातडीने पूर्ण करा, मदत पुनर्वसनासाठी दिरंगाई करू नका – अजित पवार

सोलापूर – सोलापूर शहर जिल्ह्यात पडलेल्या धुवाधार पावसामुळे व सेना नदी मधून आलेल्या पाण्याच्या निसर्गाने झालेल्या नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शेतात उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनाला झालेल्या नुकसानीची तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी मदत मिळण्यासाठी कुठलीही दिरंगाई प्रशासनाकडून होऊ नये अशा कडक शब्दात त्यांनी सूचना दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. सिना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने शहर जिल्ह्यात महापूरस्थिती निर्माण झाली आहे. उजनी आणि सिना धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे अनेक गावे पुराच्या पाण्यात सापडले आहेत. शेकडो एकर शेतीचे नुकसान झालं अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. ही गंभीर परिस्थिती सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक २२ मधील यतीम खाना, रामवाडी, लिमयेवाडी, धोंडीबा वस्ती, गैबीपीर नगर, विजापूर नाका, भीम नगर, कारगिल वस्ती, या परिसरात मोठ्या स्वरूपात मैलामिश्रित पाणी नागरिकांच्या घरात शिरले असून या परिसरात पावसाळी गटारी नसल्यामुळे पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही. या भागात मोठ्या स्वरूपात मैलामिश्रित पाणी साचल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभाग २२ मधील यतीम खाना येथे पावसाळी गटारीचे पाणी पाईपलाईन नवीन टाकणे आणि धोंडीबा वस्ती येथील नाल्याचे पडदी बांधणे या कामासाठी निधी मिळावा तसेच तात्काळ या परिसरातील पंचनामे करून प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी. या पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी बुधवारी पुना नाका येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली.
याप्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष निलेश कांबळे, शहर सरचिटणीस अभिजीत कदम, शहर संघटक माणिक कांबळे, वसंत कांबळे, आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती.
प्रभाग २२ मधील झालेल्या नुकसानीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी संपर्क करून तत्काळ या परिसरातील समस्याचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.