crossorigin="anonymous"> मुसळधार पावसामुळे प्रभाग २२ मध्ये जनजीवन विस्कळीत.. नागरिकांचे आरोग्य धोक्यात – Swarajya News Marathi

मुसळधार पावसामुळे प्रभाग २२ मध्ये जनजीवन विस्कळीत.. नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0
मुसळधार पावसामुळे प्रभाग २२ मध्ये जनजीवन विस्कळीत.. नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सोलापूर – सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने हाहाकार माजवला असून झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे ज्यामुळे नागरिकांच्या घरात हे पाणी पोहोचले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक भागांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत.

दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील एसएलबी रिक्षा स्टॉप, गोली वडापाव, उदय विकास प्रशाला, यतीमखाना, रामवाडी धोंडीबा वस्ती, मोठी इरण्णा वस्ती, गैबी पीर नगर, सनत नगर परिसरात देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक ६ चे विभागीय अधिकारी पानगल, मंडल अधिकारी भीमाशंकर बुरले, ज्युनियर इंजिनियर ओंकार शिंदे, देवकर, इलाई शेख, शिराज रजाक वकील शेख, पप्पू शेख, शिराज शेख, सिकंदर शेख, इरफान शेख,पवन खांडेकर, स्वप्नील आठवले, फिरोज पठाण, सिद्धू गायकवाड, दिनेश चलवादी, मनोज चलवादी, चंद्रकांत चालवादी, प्रमिला स्वामी, प्रमिला बिराजदार, समद मिस्तरी, शेख लियाकत, बक्सू मामा शेख, पप्पू शेख, एजाज शेख, जब्बार पटेल, काशिनाथ वनकोळे, लल्ला जाधव, सत्तार चाचा पटेल, जाकीर शेख, रमेश चलवादी, राजू बेळेनवरू, हारुण शेख, वसंत कांबळे, महादेव राठोड आनंद गाडेकरयांच्या समवेत आपातकालीन परिस्थितीची पाहणी केली यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओंबासे, अतिरिक्त उपायुक्त रवी पवार, संदीप कारंजे, नगर अभियंता सौ.सारिका अकुलवार, सोलापूर महानगरपालिका आपातकालीन विभाग व जिल्हा आपातकालीन विभाग यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून प्रभाग क्रमांक २२ येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात माहिती देऊन तत्काळ येथील नागरिकांना आर्थिक मदत अथवा बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना तत्काळ सूचना देण्यात याव्यात आणि या पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी अशी मागणी देखील किसन जाधव यांनी यावेळी केली.

नागरिकांनी देखील आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे असे आव्हान देखील यावेळी जाधव यांनी केले. लवकरच या परिसरात पूर्व स्थीती निर्माण होईल यासाठी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी सतर्क आणि निश्चिंत राहावे असेही यावेळी किसन जाधव म्हणाले. या मुसळधार पावसामुळे धोंडीबा वस्ती येथील अखिल शेख यांच्या कुटुंबामध्ये विवाह संपन्न झाले होते परंतु मैला मिश्रित पाणी घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले परिसरात देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच यतीमखाना परिसर येथे सर सय्यद प्रशाला उदय विकास प्रशाला येथे देखील मैला मिश्रित ड्रेनेच्या पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने जातीने लक्ष घालून त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा तसेच इराण वस्ती येथे अतिवृष्टी मुळे घरांचे पडझड होऊन अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत यावर प्रशासनाने तत्काळ मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करावे अशी मागणी देखील किसन जाधव यांनी केले.

दरम्यान आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह आपातकालीन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत त्वरित बचाव कार्य सुरू केल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले. अति मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक २२ मध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रशासनाने नियंत्रण आणावे अशी मागणी देखील जाधव यांनी प्रशासनाकडे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!