ईच्छा भगवंताची गणेशोत्सवाची मंडळाची श्रींची प्राणप्रतिष्ठापना… डीजे डॉल्बीला दिला फाटा

सोलापूर – सोलापुरातील मानाचा ईच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या गणरायांची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्ती भावात संपन्न झाली डीजे डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्यांना मिरवणुकीमध्ये मंडळांनी प्राधान्य दिला दरम्यान रामवाडी परिसरातील सोलापूर महानगरपालिका आरोग्य केंद्र समोर ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाने ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड मंडळा चे अध्यक्ष मोहित गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश अण्णा गायकवाड यांच्या हस्ते ईच्छा भगवंताची गणेशाची पूजा करण्यात आले याप्रसंगी मंडळा चे आदित्य जाधव(Aj), प्रेम नागेश गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, कार्तिक जाधव, अजिंक्य जाधव, करण जाधव, तुशार गायकवाड,आदित्य जाधव आनंदकर, माऊली जरग,माणिक कांबळे,वसंत कांबळे,दर्शन दुबे, तेजस गायकवाड, तन्मेश गायकवाड, अनिकेत जाधव, आदर्श जाधव, बसु शेवगार, दर्शन बिराजदार ,प्रथमेश पवार, अथर्व गायकवाड ऋषी येवले, सोनू पटेल,सौरभ पाताळे, श्रीनिवास गायकवाड, नागराज गायकवाड, साद मुलाणी, महादेव राठोड, आनंद गाडेकर, यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे गणेश भक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
दरम्यान रामवाडी सो.म.पा दवाखाना येथून मिरवणुकीस प्रारंभ करून पटवर्धन चाळ साईबाबा चौक लिमयेवाडी आदिशक्ती माता चौक सेटलमेंट मार्ग मास्तर मैदान ऐक्य चौक भोपळे चौक इच्छा भगवंताची चौक या मार्गावरून येथे मोठ्या दिमाखात ढोल,ताशा, हलग्या आणि अन्य पारंपारिक वाद्याच्या गजरात हे मिरवणूक मार्गस्थ झाले आणि इच्छा भगवंताची चौक येथे या श्रींचे प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या 11 दिवसाच्या काळामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत गरजू व गरजवंतांना शालेय उपयोगी साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, महिलांसाठी खास विविध स्पर्धा अशा कार्यक्रमांचा समावेश असणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले. ईच्छा भगवंताची मंडळाचे गेल्या अनेक वर्षापासून मंडळाचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात येते यंदाच्या वर्षी डॉल्बी डीजे ला फाटा देत पारंपारिक वाद्यांना आम्ही प्राधान्य दिले गणेशोत्सवात गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्याला खूप महत्त्व आहे मोठ्या भक्ती भावात मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले.
सालाबाद प्रमाणे यंदा देखील शेकडो संख्येने इच्छा भगवंताची परिवाराचे गणेश भक्त मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते विशेषतः डॉल्बीमुक्त मिरवणूक ही संकल्पना यंदाच्या वर्षी मंडळांनी केले आहे असेही यावेळी मंडळाचे मार्गदर्शक अनिल दादा जाधव म्हणाले. मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात धार्मिक विधिवत पूजन होऊन इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळांच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.