राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन

सोलापूर – 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून गांधी जयंती हा उत्सव सबंध भारतासह जगभरात साजरा केला जातो.गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रेल्वे लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी सभागृह नेते हाजी मकबूलसो मोहोळकर तसेच माजी नगरसेवका वाहिदाबी शेख यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
“अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर रहे”अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी सभागृह नेते हाजी मकबूलसो मोहोळकर,माजी नगरसेविका वाहिदबी शेख,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे,शहर उपाध्यक्ष अनिल उकरंडे शहर उपाध्यक्ष शकील शेख,ओबीसी प्रदेश सरचिटणीस ॲड सलीम नदाफ जेष्ठ नेते भारत साबळे अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहाराज आबादिराजे, विजीएनटी शहर अध्यक्ष रुपेश भोसले, आशुतोष नाटकर दत्तात्रय बनसोडे निशात तारांनाईक सद्दाम रंगरेज अयुब शेख सोमनाथ शिंदे मार्तंड शिंगारे युनूस शेख मकबूल मुल्ला रिझवान रंगरेज यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…