अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे होऊन मदत मिळावी

सोलापूर – सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे महापुर जन्य परिस्थिती निर्माण झाले आहे जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पिकांसह शेती वाहून गेले आहे घरात पुरामुळे सर्वत्र चिखल झाला आहे त्यामुळे बळीराजा अक्षरशः रस्त्यावर आला आहे या नुकसानीची त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी मोहोळ व माढा तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरातून नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली संतप्त शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी जाणून घेतले याप्रसंगी किसन जाधव यांनी त्यांची या दौऱ्यानिमित्त भेट घेऊन विशेषता उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहेत. शेतातील पीक देखील वाहून गेले आहे यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे त्याशिवाय धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्याने नदीकाठी देखील परिस्थिती गंभीर आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेले आहेत तसेच घरांचे पडझड देखील झाले आहेत या सर्व बाबींचा तात्काळ आपण नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना समाधानकारक मदत शासनाच्या वतीने देण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन किसन जाधव यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले.
विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ, हतुर, सिंदखेड, भंडारकवठे, निम्बर्गी , होनमुर्गी, राजुर, औज, शिरनाळ विंचूर या परिसरातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, पाकणी आणि तिरे, नंदुर या भागात अतिवृष्टमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात विशेषतः लक्ष घालून त्वरित मदत व बचाव कार्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात अशी मागणी देखील यावेळी जाधव यांनी कृषिमंत्र्यांकडे केले.
यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, प्रदेश सचिव इरफान शेख, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, शहर चिटणीस संतोष गायकवाड, राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे, आनंद गाडेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांची नुकसानाची गंभीर परिस्थिती पाहता पूरग्रस्तांचे पुनर्वसन आणि उपाययोजना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत तशा सूचना देखील आपण प्रशासनाला दिले आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार आहे मी स्वतः एक शेतकरी असून शेतकऱ्यांची व्यथा मला माहित आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ही गंभीर बाब लक्षात घेता महायुती सरकारच्या माध्यमातून समाधानकारक मदत सरकारच्या माध्यमातून आपण करू, शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव महायुती सरकार राहील अशी ग्वाही देखील यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.