सोलापूर – मराठा समाज सेवा मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचा सत्कार समारंभ आणि दसरा महोत्सव कार्यक्रम रविवार, 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी प्रशालेत होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शीचे डॉ. बी. वाय.यादव हे राहणार असून माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते आणि सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. तसेच यावेळी दसरा महोत्सव कार्यक्रमही होणार असून नूतन अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे, जनरल सेक्रेटरी प्रा. महेश माने, खजिनदार महादेव गवळी, सचिव राजेंद्र शिंदे, संचालक प्रभाकर खंडाळकर, अशोक चव्हाण, सुरेश पवार, विनायक पाटील, शिवदास चटके, नीलकंठ वाघचवरे, मुकुंद जाधव, मंगेश जाधव, नागनाथ हावळे, अलका सुरवसे या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, उषा गोकुळे, मुख्याध्यापक किशोर बनसोडे, प्राचार्या मंजूश्री पाटील, प्राचार्य डॉ. अरुण मित्रगोत्री, सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी केले आहे.