जैन शेतांबर समाजाच्या वतीने पर्युषण पर्व शोभायात्रा निघाली उत्साहात

सोलापूर – जैन पर्युषण पर्वनिमित्ताने सोलापूर शहरातील जैन बांधवांच्या माध्यमातून शोभायात्रा उत्साहात निघाली. या शोभायात्रेचे स्वागत आमदार विजयकुमार देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीने सम्राट चौक परिसरातील श्राविका चौक येथे या करण्यात आले. यावेळी तीर्थ चैतन्य विजयजी महाराज यांचे दर्शन घेऊन वंदन केले.
या शोभायात्रेवेळी आमदार विजयकुमार देशमुख, उद्योजक इंद्रमल जैन, आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक अमर पुदाले, उद्योजक केतन वोरा,भैरुलाल कोठारी, कल्पेश मालू, अनिल वेद, श्रेनिक कोचर, चेतन बाफना, कन्नु शहा सचिन कोठारी, विजय डाकलीया, भाऊसाहेब शिंदे, अमोल बनसोडे, गौतम शिंदे व मोठ्या प्रमाणात जैन समुदाय उपस्थित होता.