crossorigin="anonymous"> रिक्षा चालक शिंदेंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पंचनामा पाठवावा, पोलीस आयुक्तांकडे मागणी – Swarajya News Marathi

रिक्षा चालक शिंदेंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पंचनामा पाठवावा, पोलीस आयुक्तांकडे मागणी

0
रिक्षा चालक शिंदेंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पंचनामा पाठवावा, पोलीस आयुक्तांकडे मागणी

सोलापूर – शेळगी नाला जुना पुना नाका स्मशानभूमी जवळील नाल्यामध्ये शनिवार दिनांक 13/9/2025 रोजी रिक्षा चालक सतीश शिंदे राहणार मडकीं वस्ती, वारद फार्म, पूना रोड, सोलापूर हा छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते जुना पूना नाका स्मशानभूमी मार्गावरून नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे रिक्षा घेऊन जात असताना जुना पुना नाका दगडी पुलावरील रस्त्याचे काम चालू असल्याने मागील आठवड्यामध्ये खड्डा मारला असून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दगडी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह चालू होता.

सदर दगडी फुलावर रिक्षा चालक सतीश शिंदे हा चालवत असलेला रिक्षा पुलावर आढळून आला.परंतु सतीश शिंदे याचा सर्वत्र शोध घेण्यात आला परिसरामध्ये सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून देखील अग्निशामक दल, n आपत्ती व्यवस्थापनाकडील बोट, ड्रोन कॅमेरा द्वारे सर्वत्र शोध मोहीम घेण्यात आला. परंतु तो कोठेही आढळून आला नाही. सदर व्यक्ती सतीश शिंदे यांच्या कुटुंबामध्ये आई-वडील, बायको त्याची 7 वर्षाची मुलगी भावजय असा परिवार असून सतीश शिंदे याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती.

सध्या त्याच्या कुटुंबास उदरनिर्वाहासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावं जावे लागत आहे.यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सतीश शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केलेला आहे.तसेच मा. उपमुख्यमंत्री अजित( दादा )पवार हे पूर भागाचे पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यावेळेस त्यांच्याकडेही सतीश शिंदे यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आर्थिक मदत मिळण्यासाठी विनंती अर्ज केलेला आहे.

तरी जुना पुना नाका शेळगी नाल्यामध्ये वाहत गेलेला रिक्षा चालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळण्यासाठी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे पोलीस पंचनामा रिपोर्ट मिळणे बाबत सोलापूर शहरातील बुधवार पेठ परिसरातील सम्राट चौक जुना कारंबा नाका हे सोलापूर शहरात प्रवेश करण्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस सम्राट चौक मार्गे जुना कारंबा नाका येथे बाहेर पडत असून शहरामध्ये येणारा दुसरा पर्यायी मार्ग म्हणून 2 व्हीलर,3 व्हीलर व तसेच 4 व्हीलर ही वाहने या रस्त्याचा वापर करीत असतात.

या भागामध्ये 15 ते 16 शाळा, कॉलेज व व्यापारी वसाहती असून या ठिकाणी सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक शाळकरी मुले व व्यापारी या रस्त्यावरून ये – जा करीत असतात.एस-टी वाहतूक असल्याने असल्यामुळे या ठिकाणी छोटे व मोठे अपघात घडत आहेत.हा रस्ता फार कमकुवत झाला आहे व तसेच या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत..सम्राट चौक येथील वळणाची जागा छोटी असल्याने एस-टी बस वळण घेत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे या ठिकाणी छोटे व मोठे अपघात घडत आहेत.यास्तव येथील नागरिक,शाळकरी मुले व व्यापारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी सोलापूर शहर बुधवार पेठ परिसरातील सम्राट चौक ते जुना कारंबा नाका येथून जाणाऱ्या एसटी वाहतुकीमुळे छोटे व मोठे अपघात सातत्याने होत असल्याने सम्राट चौक या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियंत्रक याची तातडीने नेमणूक करण्यास सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!