crossorigin="anonymous"> तटकरेंना “भारत भूषण” पुरस्कार… ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं विशेष सन्मान – Swarajya News Marathi

तटकरेंना “भारत भूषण” पुरस्कार… ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं विशेष सन्मान

0
तटकरेंना “भारत भूषण” पुरस्कार… ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं विशेष सन्मान

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर निवड चाचणी व अजिंक्य कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पुणे मोशी येथील रामकृष्ण लॉन्स येथे भेट घेऊन शाल पुष्पगुच्छ तसेच अजित दादा चषक ट्रॉफी भेट देण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना लंडनमध्ये आयोजित लोकमत ग्लोबल इकॉनोमिकल कन्वेंशन मध्ये भारत भूषण या प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त खासदार सुनील तटकरे यांचा ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं किसन जाधव यांनी तटकरे यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, सचिन गुत्तेदार, शरदराव शिंदे, आनंद गाडेकर महादेव राठोड आदींची उपस्थिती होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबुतीसाठी आपण सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!