crossorigin="anonymous"> आदि मायेचा जागर करीत ईच्छा भगवंताची नवरात्रोसवाच्या शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना – Swarajya News Marathi

आदि मायेचा जागर करीत ईच्छा भगवंताची नवरात्रोसवाच्या शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना

0
आदि मायेचा जागर करीत ईच्छा भगवंताची नवरात्रोसवाच्या शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना

सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवारी मोठ्या जल्लोष मय वातावरणात आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदेचा गजर करीत भक्ती आणि शक्ती देवीचा जागर करीत शहरातील विविध मंडळांनी शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक काढून देवीची प्रतिष्ठापना केली.

दरम्यान ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूक मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीचे शुभारंभ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल,शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते विक्रम देशमुख, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे, उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे, शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण, मनोज शेजवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, अश्विनी हॉस्पिटलचे डॉ. सुजित जागीरदार, गंगामाई हॉस्पिटलचे डॉ. एस प्रभाकर, ऑक्सीजन चेस्ट क्लिनिकचे डॉ. फिरोज सय्यद, डायबेटिक केअर सेंटरचे डॉ. भास्कर पाटील, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे, शिवाजी गायकवाड, अंबादास गायकवाड जाधव, ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक अनिल जाधव, राजू याराना, चंद्रकांत ब्रदर जाधव, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर, इरफान शेख, माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी,रुक्मिणी जाधव, बिराजदार मावशी, संगीता गायकवाड, कैकाडी समाज अध्यक्ष मदन गायकवाड, प्रमिला स्वामी, यांच्यासह विविध राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक अशा अन्य क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शक्ती देवी प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीचे विधिवत पूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

ढोल, ताशा, संभळ आणि हलग्यांच्या कडकडाटात फटाक्यांची आतषबाजी करत हजारो युवकांनी यावेळी शक्ती देवी प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकी दरम्यान बहारदार लेझीमचा खेळ सादर केला. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सवाच्या लेझीम पथकामध्ये सहभागी होऊन लेझीमचा खेळ सादर केला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि उत्सव अध्यक्ष चेतन नागेश गायकवाड यांनी केले. नवरात्र उत्सव हा सण वाईटांवर चांगल्यांच्या विजयाचे प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार देवीचे महिषासुर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तीचा नाश केला त्यामुळे हा उत्सव दैवी स्त्रीत्वाचा आदर सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येतो असे मनोगत यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केले तसेच शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने तमाम शहरवासी यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे म्हणाले की शारदीय नवरात्र महोत्सवात सर्व मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत नवरात्रोत्सव अत्यंत शांततेने व उत्साही वातावरणाने साजरा करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना मंडळाचे मार्गदर्शक किसन जाधव म्हणाले की यंदाच्या वर्षी सोलापूर शहरांमध्ये डीजे मुक्त मिरवणुका काढण्यात येत आहेत प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही देखील डीजे डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्याला प्राधान्य देऊन महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे शक्ती देवीचा जागर मोठ्या उत्साही वातावरणात मंडळाच्या वतीनं नऊ दिवसात करण्यात येतो यंदाच्या वर्षी देखील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे ते म्हणाले.

यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी बहारदार लेझीमचा अत्यंत शिस्तबद्ध बहारदार लेझीमचा खेळ सादर केला. ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक सोलापूर रेल्वे स्टेशन येथून प्रारंभ होऊन कुमार चौक, मोदी पोलीस चौकी, मोदी रेल्वे ब्रिज, इराणा वस्ती, रामवाडी दवाखाना, पटवर्धन चाळ, एसलबी रिक्षा स्टॉप, काका बिअर शॉप, मरगु मास्तर मैदान सेटलमेंट ग्राउंड, या मार्गावरून निघून ईच्छा भगवंताची चौक येथे प्रतिष्ठापना मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले यावेळी धार्मिक विधिवत पूजा होऊन आदिमायेचा जागर करीत शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच देवी भक्तांची मोठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!