crossorigin="anonymous"> जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेतर्फे भव्य मध्यवर्ती मिरवणूक – Swarajya News Marathi

जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेतर्फे भव्य मध्यवर्ती मिरवणूक

0
जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेतर्फे भव्य मध्यवर्ती मिरवणूक

सोलापूर – सालाबादप्रमाणे यंदाही जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भवानी पेठ परिसरात जेमिनी मातेची भव्य दिव्य मध्यवर्ती मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.

मिरवणुकीची सुरुवात जेमिनी माता मंडळातर्फे महापूजा करून करण्यात आली. या पूजाविधीला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे , आमदार देवेंद्र कोठे, भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराध्यक्षा सौ. रोहिणी तडवळकर, तसेच सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे उपस्थित होते. मंडळाचे आधारस्तंभ सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते महापूजेचा विधी पार पडला.

यावेळी बसवराज जाटगल, शशी थोरात, लिंगप्पा पुजारी, नरसप्पा मंदकल, सिद्धाराम पुराणीक, बंडप्पा डोळे, अप्पू उळगड्डे, अशोक बोगा, हणमंतू मंदकल, माळप्पा करली, विनायक पाटील, गंगाराम डोळे, यशवंत पुराणीक यांच्यासह शेकडो मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच देवीचे पुजारी सिद्धराज यलदडी, युवा नेते बिपीन भैया पाटील, माजी अध्यक्ष पवन तगारे, अध्यक्ष प्रविण डोळे, सचिन म्हेञस, सुरेश मंदकल, विजय कोळी, नागेश गंदाळ, शिवानंद मंदकल, नागराज डबरे यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मिरवणुकीत भवानी पेठ परिसरातील सर्व गणेश मंडळांचे बंधू सहभागी झाले. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक लेझीम पथकांच्या दमदार तालासह, हजारो भक्तांनी उत्सवात सहभाग घेतला. या मिरवणुकीने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!