crossorigin="anonymous"> माध्यमिक शिक्षण विभागातील विविध मागणीकरता आंदोलनाचा इशारा – Swarajya News Marathi

माध्यमिक शिक्षण विभागातील विविध मागणीकरता आंदोलनाचा इशारा

0
माध्यमिक शिक्षण विभागातील विविध मागणीकरता आंदोलनाचा इशारा

सोलापूर : सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संचलित जीवन विकास प्रशाला भंडारकवठे येथील सहशिक्षक संतोष महादेव कमळे यांची शिक्षक मान्यता बनावट व बेकायदेशीर असल्याने त्यांची सन 2018 मध्ये चौकशी झाली होती आणि त्या चौकशी अहवालामध्ये त्यांची मान्यता ही बेकायदेशीर असल्याने सदर मान्यता रद्द करण्यासाठी तत्कालीन शिक्षण अधिकारी सत्यवान सोनवणे यांनी पुढील निर्णयास्तव विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय पुणे येथे पाठवले परंतु आजपर्यंत कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते सोनाली सुपेकर (भोसले) या संतप्त झाले आहेत.

त्याचप्रमाणे याच शिक्षण संस्थेतील जीवन ज्योत प्रशाला कंदलगाव येथील मुख्याध्यापक पिरप्पा मारुती कमळे त्यांची नियुक्ती सन 2016 मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून मुख्याध्यापकपदी जात वैधता प्रमाणपत्र एक वर्षाच्या सादर करण्याच्या अटीवरती मुख्याध्यापक कमळे यांना नियुक्ती दिली होती.

कमळे यांनी आजपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेली नाही.नियुक्ती बाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर कोणतीही कारवाई करीत नसल्याने स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या सोनाली सुपेकर(भोसले)यांनी आज दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!