crossorigin="anonymous"> सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला… सोलापुरात दुग्धाभिषेक – Swarajya News Marathi

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला… सोलापुरात दुग्धाभिषेक

0
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला… सोलापुरात दुग्धाभिषेक
सोलापूर – सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे त्या भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेड च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ जाहीर निषेध करून भारताचे भूषण असणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेवर फुले उधळून दुधाचा अभिषेक करण्यात आला.
लोकशाही च्या चार प्रमुख स्तंभापैकी न्यायव्यवस्था हा महत्त्वाचा स्तंभ आहे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टरूममध्ये झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला हल्ला आहे कोणत्याही जाती धर्मापेक्षा संविधान हे श्रेष्ठ असून या सनातनी माथेफिरू वकील हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सिताराम बाबर, फिरोज सय्यद, गजानन शिंदे, सुलेमान पिरजादे, रमेश चव्हाण, रफिक शेख, सोहेल अन्सारी, मुजम्मिल कोरबू, इस्माईल मकानदार, मल्लिकार्जुन नायकोडे, जाफर मुंशी, दिनेश पाटसकर, बालाजी वाघे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!