crossorigin="anonymous"> महर्षी मार्कंडेय महामुनींचे दर्शनाची सोय, घरबसल्या – Swarajya News Marathi

महर्षी मार्कंडेय महामुनींचे दर्शनाची सोय, घरबसल्या

0
महर्षी मार्कंडेय महामुनींचे दर्शनाची सोय, घरबसल्या

सोलापूर – पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या विशेष सहकार्याने पद्मशाली वर्ल्डवाइड, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघम यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरसह देश आणि विदेशातील पद्मशाली समाज बांधवांसाठी यंदाच्या वर्षी ‘४ श्रावण सोमवार’ आणि ‘नारळी पौर्णिमा’ (रक्षा बंधन) या खास दिवशी घरबसल्या श्री मार्कंडेय मंदिरातून महर्षी मार्कंडेय महामुनींच्या दर्शनाची आणि विधीवत महापूजेची थेट प्रक्षेपणाद्वारे (Live Streaming) व्यवस्था करण्यात आली आहे.

हा उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून सादर करण्यात येणार असून, भारतासह ३० पेक्षा अधिक विदेशांतील पद्मशाली बांधवांना कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचे दर्शन घेण्याची आणि भक्तिभावाने सहभागी होण्याची अनोखी संधी यातून मिळणार आहे.

पद्मशाली समाज भारतभर आणि परदेशांमध्ये शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने विखुरलेला आहे. या सर्व बांधवांना श्रावण महिन्यात घरबसल्या पूजा-दर्शनाची संधी मिळावी, यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.

उपक्रमामागे गौरीशंकर कोंडा यांची संकल्पना असून, याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अनुप मुरलीधर अल्ले व ब्रदर्स, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी – सदस्य, पद्मशाली सखी संघमच्या महिला पदाधिकारी – सदस्यांची मोलाचे सहभाग आहे. तसेच, श्री मार्कंडेय मंदिराचे पुरोहित राघवेंद्र आरकाल यांचेही विशेष सहकार्य मिळत असून अधिक माहितीसाठी 919021551431 या क्रमांकावर संपर्क साधावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

थेट प्रक्षेपणाची वेळ आहे अशी
पहिला श्रावण सोमवार – २८ जुलै; दुसरा सोमवार – ४ ऑगस्ट; तिसरा सोमवार – ११ ऑगस्ट; नारळी पौर्णिमा (रक्षा बंधन) – ९ ऑगस्ट (सकाळी ४ ते ६ या वेळेत); आणि चौथा व अंतिम सोमवार – १८ ऑगस्ट या चारही सोमवारी सकाळी ६.१५ ते ७.०० दरम्यान थेट पूजेसह दर्शन घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!