डॉ. अश्विनी निलकंठ राठोड यांना पीएच.डी. पदवी प्रदान

सोलापूर : डॉ. अश्विनी राठोड यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून “ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग अँड ऑडिटिंग प्रॅक्टिसेस विथ स्पेशल रेफरन्स टू वेस्टरन महाराष्ट्र” या विषयावरील सखोल संशोधनासाठी विद्यावाचस्पती (Ph.D.) ही पदवी प्रदान करण्यात आली.
दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी विद्यापीठात झालेल्या मौखिक सादरीकरणात त्यांनी आपल्या संशोधनातील महत्वाचे निष्कर्ष मांडले. ह्युमन रिसोर्स ऑडिटिंग व अकाउंटिंग प्रॅक्टिसेसमधील विद्यमान अडचणी आणि भविष्यातील सुधारणा यावर त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडत महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविल्या.
डॉ. राठोड यांचे हे संशोधन दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा आणि चिकाटीचा सर्वत्र गौरव होत आहे.
डॉ. अश्विनी राठोड या निवृत्त पोलिस उपअधीक्षक नीलकंठ राठोड यांची कन्या आहे. त्यांना विद्यावाचस्पती पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयीन व विद्यापीठीय वर्तुळात तसेच शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.