हनिट्रॅपमधील हनी बनी अधिकारी व नेत्यांवर ACB ट्रॅप प्रमाणेच गुन्हे दाखल करा

सोलापूर – काही भ्रष्ट लोकसेवक आणि राजकीय नेते हे सत्ता, अधिकाराचा व पदाचा नको तसा वापर करून महिला कर्मचारी किंवा काम घेऊन आलेल्या महिलांना वाईट नजरेने बघतात, त्यांच्या इच्छेविरुद्ध बॅड टच करतात आणि काहीजण तर थेट शारीरिक सुखाची मागणी करतात. त्यानंतर स्वतःच्या पदाचा रोख दाखवून त्या महिलांना फोन व MSG करून इतका त्रास देतात की, त्या महिलांना नाईलाजास्तव शरीरसुखाला होकार द्यावा लागतो. जसे लाच मागणीमध्ये पैसे देण्यासाठी जनतेला भाग पाडले जाते, अगदी त्याच पद्धतीने शरीरसुख देण्यासाठी गरजू महिलांना भाग पाडले जाते. या वासनांध अधिकारी व नेत्यांना #No_Means_No हा बेसिक नियम सुद्धा समजत नाही. त्यामुळे जसा ACB लाचखोरांना पकडण्यासाठी अगोदर मागणी, मग सापळा, आणि नंतर अटक करण्यासाठी ट्रप लावते अगदी तसाच पध्दतीने महिलांवर लैंगिक मागणी करणारे अधिकारी व नेत्यांचा हनिट्रॅपद्वारे पर्दाफाश करून त्यांचेवर गुन्हे दाखल करावेत व पीडित महिलांनी काढलेल्या विडिओला पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, अश्या आशयाचे निवेदन छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा व्हिसल ब्लोअर अॅड. योगेश पवार यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृह सचिव व पोलीस महानिरीक्षक यांचेकडे मेलव्दारे दिले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, अधिकारी व नेत्यांच्या लैंगिक छळाला महिला पहिल्यांदा विरोध करतात, पण जेव्हा त्यांचा शारीरिक व मानसिक छळ होतो, बदलीचे व काम न करण्याचे भय दाखवून फोन-मेसेजद्वारे त्रास दिला जातो, तेव्हा त्या हतबल होतात. आणि एक दिवस, वैतागून, हनिट्रॅपचा निर्णय घेतात. त्यानंतरच वैतागून ती महिला या सर्व त्रासाला कंटाळून हनिट्रॅपचे विडिओ काढते. “शारीरिक सुखाची मागणी” ही सुद्धा एक “लाच मागणी”च आहे.
हे अधिकारी व नेते जर महिलांना हनी_बनी करतच नसते, तर त्यांचा हनिट्रॅप कधीच झाला नसता. म्हणूनच अश्या हनी_बनी अधिकारी व नेत्यांसाठी शासनाने “सेक्स मागणी प्रतिबंधक विभाग” स्थापन करून ACB Trap प्रमाणेच हनिट्रॅपची स्वतंत्र व कायदेशीर यंत्रणा उभी करून वासनांध लोकसेवकांचा पर्दाफास करावा. सोलापुरातील काही वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांचे हनी बनी वर्तनाचे काही प्रतिनिधिक उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
1. सोलापुरातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट महिला अधिकाऱ्याला पटविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, ती काय त्याच्या तावडीत सापडली नाही, म्हणून त्या अधिकार्याने तिचा इतका प्रशासनिक व मानसिक छळ केला की, त्या बिचारीला स्वतःची बदली करून घ्यावी लागली. बदली केल्यानंतर त्याने तिचा पुण्यापर्यंत पाठलाग केला.
2. दुसऱ्या प्रकरणात तर एका अधिकाऱ्याने राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या महिलेच्या टेंडर बिल मंजुरीसाठी 10 टक्के कमिशन ऐवजी तिच्याकडे थेट शारीरिक संबंधांची मागणी केली. तिने शारीरिक सुखाची मागणी फेटाळल्यावर तिच्या कामाची जाणीवपूर्वक चौकशी लावून तिला खूप त्रास दिला.
3. एक अधिकारी तर असा आहे की, त्याची हनी_बनी करण्याची इच्छा झाली की, तो महिला अधिकारी व कर्मचार्यांना स्वत:च्या केबिनमध्ये बोलावून त्यांचेशी पांचट गोष्टी करीत बसतो.
4. सोलापुर शहर-जिल्हयातील जवळपास 14-15 नेत्यांनी असंख्य महिलांशी हनी_बनी केलेली आहे. यातील काही नेत्यांचे तर त्या हनी_बनी कार्यक्रमाचे विडिओ पुरावे सुध्दा आहेत.
काही अधिकारी व राजकीय नेत्यांच्या हनी_बनी वागण्यामुळेच महिलांनी त्यांचे हनिट्रॅप्स केले तर त्यात वावगं असे काय आहे.? त्यामुळे हनिट्रॅप करणार्या महिलांना शासन व कायदा दोषी धरणार की हनिट्रॅपमध्ये सापडलेल्या नराधम अधिकार्यांना व नेत्यांना. म्हणून हनिट्रॅपच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा अधिकारी व नेत्यांना शासनाने व कायद्याने चांगल्या वर्तनाचे धडे दिले पाहिजेत.
एका थेट अधिकाऱ्यांनी माझ्या सारख्या फाडक्या व नागड्या माणसाचे CDR तपासण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. माझ्या CDR तपासाला, तरीही त्यात काहीही गैर सापडणार नाही. परंतु, मी जर हायकोर्टातून तुमचा CDR तपासण्याचे आदेश आणले व CCTV तपासले तर महिलांशी असभ्य वागण्याचे तुमचे पुरावे उघड होवून हनी_बनी करणाऱ्या कित्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व वासनांध नेत्यांचे हनी_बनी कार्यक्रम उघड होतील, याची तुम्ही कल्पनाच करा. आणि असेही मी अंगावर आलेल्यांना शिंगावर घेण्यासाठी कायमच तयार असतो. आता मी फक्त तुमच्या एका चुकीची वाट पाहतोय.