crossorigin="anonymous"> फक्त एक मिस कॉल द्या डीजेमुक्त सोलापूरसाठी… – Swarajya News Marathi

फक्त एक मिस कॉल द्या डीजेमुक्त सोलापूरसाठी…

0
फक्त एक मिस कॉल द्या डीजेमुक्त सोलापूरसाठी…

सोलापूर : डीजेच्या आजारपणातून सोलापूरला बरे करण्यासाठी फक्त एक मिस कॉल देण्याची हाक समस्त सोलापूरकरांना वीरशैव व्हिजन व डीजेमुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले व कृती समितीचे अध्यक्ष ॲड. धनंजय माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या सोलापुरात नोकरी रोजगाराच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे परिणामी सोलापुरातील तरुण पुणे, मुंबई, बंगळूर अशा मोठ्या शहरात कायमस्वरूपी स्थलांतरित होत आहेत. हे रोखण्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या काळात सोलापुरात विधायक कार्याऐवजी, पारंपरिक वाद्यांऐवजी तरुणांना डॉल्बी डीजेची आवड लागली आहे.
सोलापुरात होणाऱ्या विविध मिरवणुकांमध्ये लावण्यात येणाऱ्या डीजे डॉल्बीमुळे अनेक सोलापूरकरांना कानाच्या, हृदयाच्या, मेंदूच्या समस्या उद्भवत आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या व आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आणि घातक आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना, गर्भवती महिलांना अशा मोठ्या आवाजामुळे गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

यामुळे सोलापूर डीजे मुक्त व्हावे अशी सामान्य जनतेची इच्छा आहे. त्यांची इच्छा मिस कॉलच्या रूपात आमच्यापर्यंत पोहोचेल. जितक्या नागरिकांकडून मिस कॉल येतील तेवढी संख्या पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात येऊन डीजे बंदीची मागणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाला वेकअप सोलापूर डिजिटल मॅगझीनचे संचालक राहुल शेटे यांचे सहकार्य लाभले आहे. कॉल केल्यानंतर मेसेज येणार आहे.
याकरिता ज्यांचा डीजेला विरोध आहे त्यांनी 9168729729 या या क्रमांकावर मिस कॉल द्यावा असे आवाहन वीरशैव व्हिजन व डीजे मुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेला डीजे मुक्त कृती समितीचे सदस्य असीम सिंदगी, कौस्तुभ करवा, वेकअप सोलापूरचे राहुल शेटे, वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी, धानेश सावळगी, सोमनाथ चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!