कुलस्वामिनी रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची सांगता

सोलापूर – सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवी मंदिरात सोमवारी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांसाठी मसरे कुटुंबीयांच्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यानंतर रात्री महापूजा झाल्यानंतर छबीना मिरवणुकीनंतर भक्तांना दूध वाटप करून नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.
पहाटे श्री रुपाभवानी मंदिरात काकड आरती, सकाळी दहा वाजता दही, दूध, पंचामृतचे अभिषेक करण्यात आले . त्यानंतर रात्री आठ वाजता नित्योपचार पूजा करून छबिना मिरवणूक काढत मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. या छबिना मिरवणुकीत आराधी व शेकडो भाविकभक्तानी ‘आई राजा उदो उदो’,सदानंदीचा उदो उदो…च्या जयघोषाने सारा मंदिर परिसर दणाणून सोडला. गेल्या अकरा दिवसांत दररोज काकड आरती, महापूजा, श्रीदेवी विविध प्रकारचे आरास, अभिषेक, होमहवन, दहीहंडी मिरवणूकसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहाने पार पडले.
याप्रसंगी ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.