अभिनंदा फाउंडेशनच्या वतीने मंगळागौर उत्सव
सोलापूर – प्रभाग क्र. 6 येथे नागपंचमीनिमित्त अभिनंदा फाउंडेशनवतीने मंगळागौर उत्सव हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत खेळ, गाणी, झिम्मा-फुगडी आणि झुल्यावर झुलत महिलांनी मनसोक्त आनंद लुटला.
या आनंददायी कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदा फाउंडेशन तर्फे नागरिकांना बसण्यासाठी परिसरात मोफत बाकड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी चेतन चौधरी, शंकर आयवाळे, सुजित खुर्द, माजीद बागवान, अभयसिंह भोसले, महानंदा भोसले, पूजा चव्हाण, अनिता गवळी आदी महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.