पाळी म्हणजे विटाळ नव्हे तर ती सृष्टीचा उत्सव..!

सोलापूर – मासिक पाळी ही शरीरातली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण समाजात अजूनही या विषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. म्हणून अनेकांच्या मनात “वयात येणं” म्हणजे काय ? शरीरात नेमके काय बदल होतात ? या बदलांचा मनावर काय परिणाम होतो ? असे कधीही न विचारलेले प्रश्न, या वयात पण मनात खोल रुतलेले होते. दि. 26 जुलै 2025 रोजी पी.एम. श्री. जि.प. शाळा, देगाव (मुली ) इयत्ता सहावी, सातवीतील मुलींसोबत मासिक पाळी या विषयावर राहुल बिराजदार यांनी संवाद साधतं पाळी म्हणजे विटाळ नव्हे तर ती सृष्टीचा उत्सव आहे असे त्यांनी सांगितले.
अनेक प्रश्नांची उत्तरे सहज समजतील अशा कृतियुक्त संवादातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणं दिली, हसवलं, विचारायला प्रोत्साहन दिलं, आणि एकंदरीत त्यांनीही विश्वासाने मन मोकळं केलं. त्या दीड तासात, किशोरवयीन मुलींचं त्यांच्या शरीराशी असणारं मैत्रीचं नातं जोडायला मदत केली.
शेवटी पाळी म्हणजे विटाळ नव्हे तर ती सृष्टीचा उत्सव आहे..! असा विचार बिंबवत पाळी गीताने सत्राचा शेवट केला. या सत्रात विशेषतः केंद्रप्रमुख आदरणीय लतीफ तांबोळी यांची सरप्राईज्ड व्हिझिट प्रेरणादायक ठरली.
हे सत्र घेण्यासाठी दुसऱ्यांदा शाळेत बोलविल्याबद्दल शिक्षिका जयश्री मेलगे – पाटील यांचे विशेष आभार तसेच सहकार्याबद्दल प्रशालेचे मुख्याधापक लंबे, बिराजदार, कुलकर्णी आणि शरीराशी मैत्री केलेल्या किशोवयीन मुलींचे ही आभार मानले.