बालविकास मंदिरात नागपंचमी सण उत्साहात साजरा

सोलापूर – भारती विद्यापीठ बाल विकास मंदिरात सोमवार दि. २८ जुलै २०२५ रोजी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी नटून थटून फेराच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बालविकास विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांच्या हस्ते नागोबाचे पूजन करण्यात आले. नागपंचमी व फेराचे गाणे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. नाग देवतेच्या पूजनानंतर फेर धरून पंचमीची गाणी ‘या ग या सयानो तुम्ही’ ‘ चल ग सखे वारुळाला’ ही फेराची गाणी शेंडे, तोटद, म्हेेत्रे, इनामदार यांनी म्हटली. त्यानंतर झिम्मा, फुगडी, दंड फुगडी हे पारंपारिक खेळ सादर करण्यात आले.
अशाप्रकारे मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका वैशाली शिंदे, संतोषी शेंडे, दीपा तोटद, भाग्यश्री म्हेत्रे, भाग्यश्री शिरसीकर, वृषाली इनामदार तसेच गौराबाई हलसंगी, प्राजक्ता मोकाशी यांच्या सहकार्याने नागपंचमी हा सण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.