सोलापुर ते श्रीशैलम बससेवा पुर्ववत सुरु

सोलापुर – हिंदु धर्मातील पवित्र श्रावण महिन्यात तीर्थक्षेत्र देवदर्शनासाठी सोलापुर आगाराने सर्वच तीर्थक्षेत्रासाठी विशेष बसेसची व्यवस्था केली आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मल्लिकार्जुन दर्शनासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बसची सोय केली असुन ही बस उद्यापासुन सकाळी सकाळी सहा वाजता सोलापुरातून सुटेल ही बस उमरगा,हुमनाबाद,हैदराबाद मार्गे श्रीशैलम येथे रात्री ८ वाजता पोहचेल अशी माहिती सोलापुरच्या आगार प्रमुखांनी सांगितले तरी सर्व भाविकांनी या बसचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.